शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

राजाराम तलावावर संकटग्रस्त नदी सुरय पक्ष्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 10:29 IST

Birds Of kolhapur- इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययुसीएन) संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या नदी सुरय (रिव्हर टर्न)सारख्या पक्ष्यांसोबत १४ स्थलांतरित पक्ष्यांची नोंद 'बर्डस्‌ ऑफ कोल्हापूर' या ग्रुपने राजाराम तलावावर रविवारी केलेल्या पक्षी गणनेत नोंदविली गेली आहे. एकूण ६७ प्रजातींच्या ८३६ पक्ष्यांची नोंद या तलावावर झाली आहे. राजाराम तलावावरही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले

ठळक मुद्देराजाराम तलावावर संकटग्रस्त नदी सुरय पक्ष्याची नोंद बर्डस्‌ ऑफ कोल्हापूरची पक्षी गणना : ६७ प्रजातींच्या ८३६ पक्ष्यांचा आढळ

संदीप आडनाईककोल्हापूर : इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययुसीएन) संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या नदी सुरय (रिव्हर टर्न)सारख्या पक्ष्यांसोबत १४ स्थलांतरित पक्ष्यांची नोंद 'बर्डस्‌ ऑफ कोल्हापूर' या ग्रुपने राजाराम तलावावर रविवारी केलेल्या पक्षी गणनेत नोंदविली गेली आहे. एकूण ६७ प्रजातींच्या ८३६ पक्ष्यांची नोंद या तलावावर झाली आहे. राजाराम तलावावरही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.'बर्डस्‌ ऑफ कोल्हापूर' या ग्रुपमार्फत कोल्हापूर शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या भागात पक्षी गणना करण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी राजाराम तलावावर पक्षी गणनेचा दुसरा भाग पूर्ण झाला. पुढील रविवारी, दि. १७ रोजी सकाळी ६.४५ पासून शिवाजी विद्यापीठ परिसरात पक्षी गणना करण्यात येणार आहे.राजाराम तलावावर कॉमन सॅन्डपायपर (सामान्य तुतारी), ग्रीन सॅन्डपायपर (हिरवी तुतारी), वूड सॅन्डपायपर (ठिपकेवाली तुतारी), कॉमन ग्रीनशांक (सामान्य हिरवा टीलवा), क्लॅमरस रीड वोब्लर (दंगेखोर बोरू वटवट्या), ब्लिथस्‌ रीड वोब्लर (ब्लिथचा बोरू वटवट्या), पॅडीफील्ड वोब्लर (धान वटवट्या), बुटेड वोब्लर (पायमोज वटवट्या), रोजि स्टारलिंग (गुलाबी मैना), टायगा फ्लायकेचर (लाल कंठाची माशीमार), ब्राउन श्राइक (तपकिरी खाटिक), ब्लिथस्‌ पीपीट (ब्लिथची तिरचिमणी), येल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी) हे १४ स्थलांतरित पक्षी आढळले, मात्र राजाराम तलावावरही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.या कोल्हापूर पक्षी गणनेस ज्येष्ठ पक्षीमित्र दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेचे आयोजन प्रणव देसाई आणि सत्पाल गंगलमाले यांनी केले आहे. या पक्षी गणनेमध्ये अभिषेक शिर्के, ऋतुजा पाटील, स्वप्नील असोडे, पृथ्वीराज सरनोबत यांच्यासह कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील, पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदवला.गतवर्षी आढळले होते ४५४ पक्षीमागील वर्षीच्या पक्षी गणनेमध्ये ६३ प्रजातींचे ४५४ पक्षी नोंदवले गेले होते. या पक्षी गणनेतून जमा झालेली माहिती 'वेटलाँड इंटरनॅशनल' या पर्यावरणीय संघटनेच्या 'इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस'मध्ये नोंद करण्यात येत आहे. 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण