शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत आढळले दुर्मीळ इजिप्शियन (पांढरे) गिधाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 16:46 IST

Egyptian vulture Ratnagiri- रत्नागिरीतील चंपक मैदान परिसरात हौशी पक्षी निरीक्षकांना इजिप्शिअन गिधाड (पांढरे गिधाड) आढळले आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर ते भटकंती करीत रत्नागिरीत आले असावे, असा अंदाज पक्षी निरीक्षकांनी वर्तविला आहे. हे गिधाड आढळल्याने रत्नागिरीत आणखी एका दुर्मीळ प्रजातीची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळामुळे पक्षांना फटका भटकंती करत रत्नागिरीत आल्याचा अंदाज

रत्नागिरी : रत्नागिरीतील चंपक मैदान परिसरात हौशी पक्षी निरीक्षकांना इजिप्शिअन गिधाड (पांढरे गिधाड) आढळले आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर ते भटकंती करीत रत्नागिरीत आले असावे, असा अंदाज पक्षी निरीक्षकांनी वर्तविला आहे. हे गिधाड आढळल्याने रत्नागिरीत आणखी एका दुर्मीळ प्रजातीची नोंद करण्यात आली आहे.रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदानात पक्षीनिरीक्षक आशिष शिवलकर, डॉ. प्रणव परांजपे आणि ॲड. प्रसाद गोखले यांनी या गिधाडाचे छायाचित्र टिपले आहे. या प्रजातीमधील इजिप्शियन गिधाड आकाराने लहान असते. भटकंती करीत ती इकडे येतात.

हाडाच्या आतमधील भाग हे गिधाड सर्वाधिक प्रमाणात खातात. यांचे मूळ दक्षिण आफ्रिकेत असून, थंडीच्या हंगामात ते राजस्थान, दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्थलांतर करते. कोकणात ते दुर्मीळच आहे. कोकणातील वातावरणाचा विचार करता येथे ही गिधाडे क्वचितच दिसून आली आहेत. या गिधाडाचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.महाराष्ट्रातून गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली तरी पांढऱ्या पट्ट्याची, लांब चोचीची पांढरी गिधाडे १९९० आणि त्यापूर्वी मोठ्या संख्येने आढळत होती. अपुऱ्या खाद्यपुरवठ्यामुळे गिधाडांची संख्या कमी होत आहे. त्यांचा समावेश नष्टप्राय श्रेणीतील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला आहे.निसर्ग चक्रीवादळाचा फटकाकोकणात गिधाडांचा अधिवास असून, रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील गिधाडे आढळतात. तेथे हिमालयीन ग्रीफन गिधाडांची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी रायगड-रत्नागिरीला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका गिधाडांच्या अधिवासाला बसला होता. परिस्थिती पूर्ववत होऊ लागल्यावर ती आपापल्या निवासस्थानी परतू लागली आहेत. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवenvironmentपर्यावरणRatnagiriरत्नागिरी