शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

किमान ऑक्सिजनसाठी तरी मुंबईतील जंगल टिकवा; पर्यावरणप्रेमींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 10:38 AM

जागतिक जैवविविधता दिन विशेष - मुंबईत गवताळ कुरणे आहेत. येथे किडे असतात. त्यांना खाण्यासाठी पक्षी येतात. हेही एका अर्थाने वन्यजीव आहेत.

सचिन लुंगसेमुंबई :  मुंबईत नव्याने रस्ते बांधले जात नसले तरी रस्त्यांच्या दुस्तीसह प्रकल्प आणि इतर कामांसाठी २०१८ साली १२ हजार आणि २०१९ साली १४ हजार झाडांवर संकट ओढावले आहे. मिठी नदीलगतची जैवविविधताही नष्ट झाली आहे. आता आपण जैवविविधता टिकविण्यासाठी काम केले पाहिजे. कारण १८ लाखांपैकी १० लाख पेशी धोक्यात आल्या आहेत. किमान ऑक्सिजनसाठी तरी मुंबईतील जंगल टिकवा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

मुंबईत गवताळ कुरणे आहेत. येथे किडे असतात. त्यांना खाण्यासाठी पक्षी येतात. हेही एका अर्थाने वन्यजीव आहेत. पाणथळ जागा, तलाव यांचे रक्षण केले पाहिजे. येथे मोठ्या संख्येने वन्यजीव आढळतात. वन्य जीवांमध्ये सर्पदेखील येतात. एकट्या मुंबईमध्ये किमान ४० प्रजातींचे सर्प आढळतात. पवई तलाव १८९० साली बांधून पूर्ण झाले, त्यावेळी ते ३७० एकर परिसरात पसरलेले होते. पावसात पाणी वाहून १७ हजार एकर पाणलोट क्षेत्र वाढायचे. ५० वर्षांपूर्वी येथे आढळणारी जैवविविधता आता आढळत नाही. बोरिवली नॅशनल पार्क, धारावी येथील निसर्ग उद्यान येथे प्राणी-पक्षी पाहण्यास मिळतात. माहीम, भांडुप, शिवडी, वांद्रे येथे दलदलीचे प्रदेश आहेत; तेथे जैवविविधता आहे. जैवविविधता हा जंगलाचा भाग आहे. ती जपणे ही काळाची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले.

...अन् मुंबईतील जैवविविधतेचा झाला ऱ्हास

३० वर्षांत मुंबईत असलेले ४२ टक्के जंगल नष्ट झाले.४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली.२० वर्षांत येथील ८८ प्रभागांपैकी ६८ प्रभागांतील हिरवळ कमी झाली.१३ टक्के हिरवळ शिल्लक आहे.गोरेगावात २००१ मध्ये ६२.५ टक्के भागांत हिरवळ होती. आज १७ टक्के उरली आहे.

जैवविविधतेचे माहेरघरमिठी आणि ओशिवरा या दोन नद्यांचे मूळ क्षेत्र आरेच्या भागात आहे. हा भाग जैवविविधतेचे माहेरघर आहे. आरे हे संरक्षित जंगल आहे, जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. जगातले शहरात वसलेले एकमेव जंगल आहे. ‘आरे’चा भाग हा भूजलासाठी महत्त्वाचा पाणलोट क्षेत्र आहे, त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी मांडले.

खारफुटीजवळ दिसणारे पक्षी गायबजैवविविधता ही साखळी असते. त्याच्या हानीचा फटका प्रत्येक घटकाला बसतो. मुंबईतील जैवविविधतेचा अभ्यास झाला नाही. अभ्यास होत नसल्याने उंच इमारती होण्याआधी कोणते पक्षी, झाडे होती, याची माहिती उपलब्ध होत नाही. काही झाडांचा वापर पक्षी अंडी घालण्यास करतात. मात्र, ही झाडे नष्ट होत आहेत. खारफुटीचे क्षेत्र वाढले, असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र खारफुटीजवळ दिसणारे पक्षी गायब आहेत.- विजय अवसरे, निसर्ग अभ्यासक

टॅग्स :forestजंगलenvironmentपर्यावरण