शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

रामसरच्या यादीत समाविष्ट होणार राज्यातील पहिले अभयारण्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 10:25 IST

जैवविविधतेने संपन्न नांदूर-मधमेश्वर; नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्राचे ‘भरतपूर’

- अझहर शेखनाशिक : सस्तन वन्यजीवांच्या आठ प्रजाती, २४ प्रकारचे मासे, २६५ पेक्षा अधिक स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांच्या प्रजातींचा हंगामी अधिवास, विविध पाणवनस्पती, झाडेझुडपांसह फुलपाखरांच्या ४१ प्रजातींमुळे निफाड तालुक्यातील चापडगाव क्षेत्रातील नांदूर-मधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची वाटचाल ‘रामसर’च्या दिशेने सुरू आहे.रामसरच्या यादीत भारतातील २६ पाणथळ जागांचा समावेश झाला आहे. स्वीत्झर्लंडमधील रामसर सचिवालयाकडे केंद्राकडून ‘नांदूर-मधमेश्वर’चा प्रस्ताव गेला आहे. तसे झाल्यास रामसरच्या यादीत समाविष्ट होणारे हे पाणथळ ठिकाण महाराष्ट्रातील एकमेव ठरेल. ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी ‘हे तर महाराष्ट्राचे भरतपूर’ असे गौरवोद्गार या अभयारण्य भेटीत काढले होते, असे येथील काही ज्येष्ठ पक्षीमित्र तथा वन्यजीव विभागाचे अधिकारी सांगतात. यावरून येथील जैवविविधता लक्षात येते.या अभयारण्याचे जतन-संवर्धन करण्यासाठी नाशिक वन्यजीव विभागाकडून अभयारण्य क्षेत्र निश्चित केले जात आहे. यासाठी सीमांकनाचा प्रस्ताव वन्यजीव विभागाकडून तयार करण्यात आला. या प्रस्तावात राज्याच्या वन्यजीव मंडळाने काही सूचना केल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करीत सोमवारपर्यंत सीमांकनाचा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव विभागाकडे पाठविला जाणार असल्याचे सहायक वनसंरक्षक भरत शिंदे यांनी सांगितले.‘रामसर’च्या ८८ प्रजाती नांदूर-मधमेश्वरलानांदूर-मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या २६५ प्रजातींची येथे नोंद झाली आहे. रामसरमध्ये आढळणाऱ्या १४८ स्थलांतरित पक्ष्यांपैकी ८८ प्रजाती नांदूर-मधमेश्वरमध्ये आढळून येतात.5687 पक्ष्यांची नोंदराज्यातील विविध जिल्ह्यांमधील धरणे भरल्यामुळे परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे नांदूर-मधमेश्वर अभयारण्यात होणारे आगमन लांबणीवर पडले आहे. ऑक्टोबरअखेरच्या प्रगणनेत हळदी-कुंकू बदक, थापट्या (नॉर्दन शॉवलर), जांभळी पाणकोंबडी, गढवाल, ग्रेट स्पॉटेड ईगल, मार्श हॅरियर, पाणकावळे, रंगीत करकोचा, ग्लॉसी आयबीस, उघड्या चोचीचा करकोचा, चमचा, पिनटेल, टफ्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, राखी बगळा, जांभळा बगळा, तुतवार, किंगफिशर, हुदहुद, ग्रीन बी-ईटर या पक्ष्यांनी नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्यात एन्ट्री केली आहे. गणनेदरम्यान अभयारण्यात एकूण ५ हजार ६८७ पक्षी आढळून आले.फ्लेमिंगोची एन्ट्री : नांदूर-मधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात यंदा परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबणीवर पडले असले तरी फ्लेमिंगोने अभयारण्य क्षेत्रात नुकतीच एन्ट्री केली आहे. येथील पक्षीनिरीक्षकांना जलाशयावर पाच फ्लेमिंगो पक्षी आढळून आले आहेत. यावर्षी फ्लेमिंगोचे आगमन तसे लवकरच झाले आहे.

 

टॅग्स :nandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरenvironmentपर्यावरण