शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील मोर्णा नदी नव्हे, डासांचे उत्पत्ती केंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 13:01 IST

पाण्याचा वापर ना शेतीसाठी, ना पिण्यासाठी

ठळक मुद्देअकोल्याचे सांडपाणी थेट नदीत 

- सदानंद सिरसाट

अकोला : शहरातील सांडपाणी थेट मोर्णा नदीत सोडले जाते. त्यामुळे जलचरांना धोका निर्माण झाला असून, नदीलाप्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरातील मोठ्या पुलाखालील पाण्याचा नमुना सर्वाधिक प्रदूषित असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधीच दिला आहे. या पाण्याचा वापर ना शेतीसाठी केला जातो, ना पिण्यासाठी. त्यामुळे ही नदी म्हणजे केवळ डासांचे उत्पत्ती केंद्र होऊन बसली आहे. 

शहराची पाण्याची गरज महान येथील काटेपूर्णा धरणातील साठ्यावर अवलंबून आहे. शहरापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या या धरणातून पाणी आणले जाते. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार अकोला शहराची लोकसंख्या ५ लाख ३८ हजार आहे. दैनंदिन ६.५० कोटी लिटर पाणी शहरासाठी लागते. त्यापैकी ३.५० कोटी लिटर पाणी सांडपाण्याच्या रूपात बाहेर पडते. या सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची कोणतीही व्यवस्था अद्याप अस्तित्वात आलेली नाही. प्रदूषित पाणी शहरातील छोट्या नाल्यांतून थेट मोर्णा नदीत सोडले जाते. त्यामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला गटाराचे रूप आले आहे.  

सांडपाणी व्यवस्थापनासाठी शहरात भूमिगत गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यातील २५ टक्केही काम झालेले नाही. मलनिस्सारण वाहिन्यांचे कामही सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची निर्मिती शहरालगतच्या शिलोडा येथे केली जात आहे. प्रदूषित पाण्यासह शहरातील कचराही मोठ्या प्रमाणात नदीत फेकला जातो. त्याचाही दुष्परिणाम पाणी, त्यातील जलचर जिवांवर होत आहे. 

पाण्याचा उपयोगच नाहीअकोला शहरातून पुढे गेल्यानंतर कोणत्याही गावामध्ये मोर्णा नदीतील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही, तसेच सिंचनासाठीही ते वापरले जात नाही. सुकोडा गावातील काही शेतकरी नदीपात्रातील पाणी उपसा पद्धतीने पिकांना देतात. शहरापासून २०-२५ कि.मी. अंतरावर नदी कोरडी पडते.

शहरातील सांडपाणी व्यवस्थापन करून त्यावर नजीकच्या शिलोडा येथे प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. मार्चअखेरपर्यत काम पूर्ण होऊ शकते. प्रक्रिया केलेले पाणी पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र तसेच भोड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला देण्याचे नियोजन आहे.    -सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, महापालिका

सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले. त्यातून विषारी घटकांत वाढ झाली. त्यामुळे जैवविविधता नष्ट होते. नालीचे पाणी नदीत जाऊच नये, अशी व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. -डॉ. हरीश मालपाणी, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, रालतो महाविद्यालय, अकोला

टॅग्स :environmentपर्यावरणriverनदीpollutionप्रदूषणAkolaअकोला