शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फोंडाघाटात वाघाच्या संपूर्ण परिवाराने पुन्हा दिले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 14:47 IST

Tiger kolhapur : सिंधुदुर्गातील फोंडा घाटात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी रात्री वाघाच्या परिवाराचे दर्शन झाले. आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र नव्याने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत तीन ते चार वेळा वाघाचे दर्शन झाले आहे. आता तर संपूर्ण परिवाराचे दर्शन झाले आहे

ठळक मुद्देफोंडाघाटात वाघाच्या संपूर्ण परिवाराने पुन्हा दिले दर्शन वाघीण, दोन बछड्यांचा समावेश : संरक्षित भ्रमणमार्गामुळे हालचालीत वाढ

संदीप आडनाईक कोल्हापूर : सिंधुदुर्गातील फोंडा घाटात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी रात्री वाघाच्या परिवाराचे दर्शन झाले. आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र नव्याने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत तीन ते चार वेळा वाघाचे दर्शन झाले आहे. आता तर संपूर्ण परिवाराचे दर्शन झाले आहे. राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाट येथे या व्याघ्र परिवाराचे दर्शन झाल्याची माहिती राधानगरी वन्यजीव विभागाचे वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली.आंबोली, दोडामार्ग, तिलारी या जंगलक्षेत्राला गोव्यातील म्हादई अभयारण्य आणि कर्नाटकातील भीमगड अभयारण्य क्षेत्रही जोडलेले असल्यामुळे वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता विशेषत: वाघांच्या प्रजननाकरिता हा सलग पट्टा उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध होत आहे.

राखीव संवर्धन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे वाघांचा हा भ्रमणमार्ग संरक्षित झाला आहे. हा मार्ग सलग जोडला गेल्यामुळेच आंंबोली, चंदगड, आजरा, राधानगरी आणि चांदोली अभयारण्यापर्यंत वाघांच्या हालचाली वाढताना दिसत आहेत. कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी तसेच तिलारी वन्यजीव अभयारण्याचा परिसर हा टायगर कॅरिडॉर म्हणून ओळखला जातो. २०१४ मध्ये झालेल्या जनगणनेत तीन वाघ असल्याची नोंद आहे.कोकणात चिरा आणण्यासाठी गेलेल्या मडिलगे येथील एका ट्रकचालकाला बुधवारी (दि. १९) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फोंडा घाटात पूनम हॉटेलच्या वरच्या बाजूस एक वाघीण आणि दोन बछडे दिसले. या चालकाने वाघिणीच्या बछड्याने झाडावर उडी मारतानाचा व्हिडिओ वन विभागाकडे सुपुर्द केला आहे.आतापर्यंत तीन वेळा दर्शनयापूर्वीही मार्च आणि एप्रिल महिन्यांत वनविभागाला वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे आढळले होते. आंबोलीत यापूर्वीही वाघांच्या पावलांचे ठसे आणि वाघांनी केलेल्या शिकारीचे अवशेष मिळाले होते. लॉकडाऊनमध्येही आंबोली परिसरात वाघाने म्हशीची शिकार केली होती. मार्च महिन्यात आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाने केलेली गव्याची शिकार आणि वन कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान वाघाच्या पावलांचे ठसे सापडले होते. एप्रिल महिन्यात आंबोलीतील हिरण्यकेशी परिसरात वाघाचे दर्शन झाले होते. येथील जंगल परिसरात वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हा वाघ दिसला होता. परिसरातील ग्रामस्थांनाही या वाघाचे दर्शन होत होते. त्या संदर्भात त्यांनी वन विभागाला वर्दी दिली होती.राखीव संवर्धन क्षेत्र वाघांसाठी फायद्याचेवन्यजीव मंडळाच्या शिफारशीवरून डिसेंबर, २०२० मध्ये राज्य सरकारने पाच हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या आंबोली-दोडामार्ग आणि २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील चंदगड तालुक्यातील जंगलक्षेत्र संरक्षित करून त्याला कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून राखीव केले होते. तसेच याला जोडून असलेल्या २९.५३ चौरस किलोमीटरचे तिलारी जंगलक्षेत्रही राखीव संवर्धन म्हणून संरक्षित केले होते. तीन राज्यांच्या सीमांवरील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्र हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. 

टॅग्स :TigerवाघAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनradhanagari-acराधानगरीkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्ग