शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीचे होतेय वाळवंट, 77 टक्के जमीन झाली कोरडी; समस्या अतिशय गंभीर, अब्जावधी लाेकांना बसला फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 08:04 IST

संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंध संमेलन’ने (यूएनसीसीडी) हा अहवाल जारी केला. हरितगृह वायू उत्सर्जन राेखले नाही तर, येत्या काही वर्षांमध्ये ३% आर्द जमीन कोरडी होईल.

वाॅशिंग्टन : भविष्यातील युद्धे पाण्यासाठी हाेतील, असे अनेकदा बाेलले जाते. याचे कारणही तेवढेच चिंताजनक आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पृथ्वीवरील जवळपास ७७ टक्के जमीन काेरडी झाली आहे. या भागात २०२० पर्यंतच्या तीन दशकांमध्ये वातावरण काेरडे झाले असून पाण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे.

‘संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंध संमेलन’ने (यूएनसीसीडी) हा अहवाल जारी केला. हरितगृह वायू उत्सर्जन राेखले नाही तर, येत्या काही वर्षांमध्ये ३% आर्द जमीन कोरडी होईल. काेरडेपणाच्या धाेक्यावर प्रथमच शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण झाल्याचे यूएनसीसीडीचे कार्यकारी सचिव इब्राहिम थियाव यांनी सांगितले. 

५ अब्ज लाेकांना बसणार फटकाकाेरड्या जमिनीवर राहणारी लाेकसंख्या गेल्या ३ दशकात वाढून २.३ अब्ज एवढी झाली आहे. असेच चित्र कायम राहिले तर वर्ष २१०० पर्यंत ही लाेकसंख्या ५ अब्जांपर्यंत वाढू शकते.पृथ्वीवर वाळवंटीकरण वाढेल आणि हवामानातील काेरडेपणामुळे अब्जावधी लाेकांचे आयुष्य आणि उपजीविकेला धाेका निर्माण हाेईल, असा इशारा अहवालातून देण्यात आला आहे.

भारतापेक्षा एक तृतीयांश माेठा भाग ४३ लाखचाैरस किलाेमीटर एवढ्या प्रदेशापर्यंत काेरड्या जमिनीचा विस्तार आहे.

भारतात माेठ्या प्रदेशात दुष्काळाचा धाेकाअहवालात म्हटले आहे की, भारताचा एक माेठा प्रदेश काेरडा पडणार असून चीनलाही असाच धाेका आहे.याशिवाय इजिप्त, पाकिस्तान, मध्य पश्चिम अमेरिका, उत्तर-पूर्व ब्राझील, दक्षिण-पूर्व अर्जेंटिना, संपूर्ण भूमध्य सागरीय क्षेत्र, काळा समुद्राची किनारपट्टी, दक्षिण ऑस्ट्रेलिया इत्यादी प्रदेशांना माेठा फटका बसणार आहे.

या भागाला बसू शकताे फटकाnअहवालानुसार, जमीन काेरडी हाेण्याची स्थिती युराेपमधील ९६ टक्के भागासह पश्चिम अमेरिका, ब्राझील, आशिया आणि मध्य आफ्रिकेचा भाग शामील आहे.nदक्षिण सुदान आणि टांझानियाचा माेठा प्रदेश काेरडा हाेणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ