दोडामार्ग : तिलारी धरण क्षेत्रातील आयनोडे येथे सामायिक क्षेत्रात (सर्व्हे नं. ५१) बेसुमार वृक्षतोड होत आहे. या क्षेत्राशी कोणताही संबंध किंवा अधिकार नसलेल्या काहीजणांनी राजरोसपणे अतिक्रमण सुरू केले आहे. त्यामुळे संबंधित खातेदार आक्रमक बनले आहेत. चालू असलेली वृक्षतोड थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित खातेदारांनी लेखी निवेदनाद्वारे दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याकडे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, मूळ आयनोडे गावातील तिलारी धरणाच्या उजव्या बाजूला बोर्येवाडी येथील सामायिक क्षेत्रात सर्व्हे नं. ५१ मध्ये काही बिगर खातेदारांनी वृक्षतोड केली आहे. अजूनही ही वृक्षतोड चालूच आहे. कोरोना काळात कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून अतिक्रमण करून ते बेसुमार वृक्षतोड करीत आहेत.३ मे रोजी काही खातेदारांनी तिलारी धरणाच्या माथ्यावरून तोड होत असल्याचे पाहिले. पाच-सहा लाकूड कापणाऱ्या मशीनचे आवाज येत होते. सामायिक सर्व्हे नंबर ५१ ला लागून तिलारी धरणासाठी संपादित केलेल्या सर्व्हे नं. ३० व सर्व्हे नं. ४३ ही शासकीय जमीन आहे. तिथेही वृक्षतोड केली जात आहे. त्याबाबत तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून माहिती दिली. त्यानुसार उपविभागीय वनाधिकारी सावंतवाडी यांच्या कार्यालयाशी फोनवरून संपर्क साधला असता, त्यांनी लेखी तक्रार वन विभागाच्या कार्यालयात द्या. त्यावर तातडीने कारवाई होईल असे सांगितले.सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्ही शेतकरी प्रत्यक्ष येऊ शकत नसल्याने आम्ही आमच्या तक्रारी मेलद्वारे संबंधित कार्यालयांना पाठवित आहोत. या अर्जाचा विचार व्हावा, असे निवेदन संजय सावंत, मधुसुदन सुतार यांच्यासह अन्य २३ जणांनी दिले आहे.तक्रार अर्ज देण्याची सूचनातिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्या क्षेत्राच्या पाहणीकरिता आमच्या कर्मचाऱ्यांना सांगतो. तुमच्या सामायिक क्षेत्रात वृक्षतोड होत आहे. त्याबाबत तुम्ही तहसीलदार व उपविभागीय वनअधिकारी सावंतवाडी किंवा वनक्षेत्रपाल दोडामार्ग यांच्याकडे रितसर तक्रार अर्ज द्या, असे सांगण्यात आले, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तिलारी धरण क्षेत्रातील आयनोडे सामायिक क्षेत्रात वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:05 IST
Tilari dam Sindhudurg : तिलारी धरण क्षेत्रातील आयनोडे येथे सामायिक क्षेत्रात (सर्व्हे नं. ५१) बेसुमार वृक्षतोड होत आहे. या क्षेत्राशी कोणताही संबंध किंवा अधिकार नसलेल्या काहीजणांनी राजरोसपणे अतिक्रमण सुरू केले आहे. त्यामुळे संबंधित खातेदार आक्रमक बनले आहेत. चालू असलेली वृक्षतोड थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित खातेदारांनी लेखी निवेदनाद्वारे दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याकडे केली आहे.
तिलारी धरण क्षेत्रातील आयनोडे सामायिक क्षेत्रात वृक्षतोड
ठळक मुद्देतिलारी धरण क्षेत्रातील आयनोडे सामायिक क्षेत्रात वृक्षतोड खातेदारांची लेखी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे कारवाईची मागणी