शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

मेहरूण तलावातील जैव विविधता बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 13:08 IST

अजय पाटील । जळगाव : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे पर्यावरणात फार मोठे बदल झालेले पहायला मिळत ...

अजय पाटील ।जळगाव : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे पर्यावरणात फार मोठे बदल झालेले पहायला मिळत आहेत. प्रदूषणाचा स्तर कमी होऊन वन्यप्राण्यांचाही वावर आता सर्वत्र होताना दिसू लागला आहे. शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाच्या ठिकाणीही मानवी वावर कमी झाल्याने तलावातील जैव विविधता आता बहरू लागली आहे.कधीकाळी मेहरूण तलाव परिसरात पट्टेदार वाघांचेही अस्तित्व होते. मात्र, काही वर्षांपासून जळगाव शहराचे वाढत जाणारे क्षेत्र, तलाव परिसरात होणारे अतिक्रमण, तलावात आजूबाजुच्या भागातील घरांचे जाणारे सांडपाणी व तलाव परिसरात वाढत जाणारा मानवी वावर यामुळे तलावातील समृध्द जैव विविधता धोक्यात आली आहे. विदेशी स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन असलेल्या मेहरूण तलावात काही वर्षांपासून पक्ष्यांचेही आगमन कमी होऊ लागले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून मानवी जीवनावर कोरोना सारख्या आजाराने घातक परिणाम केला असताना, कोरोनामुळे मेहरूण तलाव भागात मानवी वावर कमी झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांचे थवेच्या थवे मेहरूण तलाव परिसरात आढळून येत आहेत. यासह फुलापाखरांचा वावर मेहरूण तलाव परिसरात वाढला आहे. यासह मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने तलावातील मासेमारीदेखील थांबली आहे. त्यामुळे ५ प्रकारचे मासे सापडणाऱ्या माशांनाही यामुळे जीवदान मिळत आहे. जिल्ह्यासह शहराच्या दृष्टीनेदेखील मेहरूण तलावाचे मोठे महत्त्व आहे. तलाव परिसरातील जैव विविधता लक्षात घेता भविष्यात या ठिकाणी रिसर्च सेंटर सुरू करता येऊ शकते. यासह मनपाकडून या परिसरात बटरफ्लाय गार्डनदेखील प्रस्तावित आहे. पर्यावरणप्रेमींसाठी हे अभ्यासासाठी विद्यापीठ ठरू शकते.मानवी वावर कमी झाल्याने फायदा-मेहरुण तलावाच्या ६२ हेक्टरमध्ये एकेकाळी ५८ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आज प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे नष्ट होत आहे. येथे १५ ते २० सर्पांच्या प्रजातींचा अधिवास आहे. ४० प्रकारची फुलपाखरे, ११८ प्रकारचे विविध किटक , २३ प्रकारच्या गवताळ वनस्पती, ५ प्रकारचे मासे यांचा तलावावर अधिवास आहे़ शेकडो पान वनस्पतींचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात आहेत.-तलावाकाठावर गुरांना धुण्यासाठी येणाºयांचेही प्रमाण कमी झाल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण थांबले आहे. मात्र, अजूनही आजूबाजुच्या परिसरातून सांडपाणी थेट तलावात जात आहे. यावर बंदोबस्त केला तर जलप्रदूषणदेखील थांबणार आहे. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष घालण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.तरुण मुलांची संख्या मेहरूण तलावात अधिक असायची, त्यात अनेक युवक तलावात दगडदेखील मारायचे यामुळे पक्ष्यांना हा अधिवास धोकेदायक वाटू लागत होता. मात्र,आता मानवी वर्दळ कमी झाल्याने त्याचा परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर झाला आहे. भविष्यात याच प्रकारे वर्दळ कमी झाली तर जैव विविधता आणखीन बहरू शकते.-राजेंद्र गाडगीळ,पक्षी निरीक्षकलॉकडाउनमुळे जैव विविधता बहरली असली तरी हे केवळ लॉकडाउनच्या काळापुरतीच राहील, आता लॉकडाउनमुळे जी जैव विविधता बहरली आहे. ती कायम वाढावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तलावात येणारे सांडपाणी रोखणे गरजेचे आहे. तसेच तलाव परिसरात वाहनांना बंदी घालावी यामुळे भविष्यातही ही जैव विविधता कायम राहिल.-सुजाता देशपांडे, अध्यक्षा, भारती फाउंडेशन.

टॅग्स :environmentपर्यावरणJalgaonजळगाव