आम्ही याच खोलीत बसलो होतो. कोणाला माहीत होते की, आम्ही दोघेही करोडपती होऊ, असे सांगत सचिन पायलट यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यातील जनतेचे आभार मानले. सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. ...
राजस्थानचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, याबाबतचा तिढा सुटला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोतच पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली आहे. ...
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम विधानसभांच्या निवडणुकीत भाजपाच्या उधळलेल्या वारूला मतदारांनी लगाम घालून, ‘देश बदल रहा है’ची नांदीच घडविली आहे. ...