शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 05:22 IST

यंदा आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुमारे दीड ते दाेन महिने उशिराने सुरुवात झाली आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून प्रयत्न सुरू आहेत.  

लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा आरटीईमध्ये सुधारणांच्या नावे केलेल्या बदलाला उच्च न्यायालयाने साेमवारी स्थगिती दिली. त्यामुळे शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई पाेर्टलवर मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली. आरटीई अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यास केव्हा सुरुवात हाेणार?  तसेच खासगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळेल का? अशी विचारणा पालकांकडून हाेत आहे. 

आरटीई कायद्याच्या नियमात केलेल्या बदलामुळे वंचित आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना विनाअनुदानित, खासगी शाळांमध्ये प्रवेश नाकारण्याच्या निर्णयाला राजकीय तसेच सामाजिक आणि पालक संघटनांनी विराेध करीत आंदाेलन छेडले हाेते. तसेच, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. न्यायालयाने आरटीईतील बदलांना स्थगिती दिल्यामुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली. दरम्यान, यंदा आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुमारे दीड ते दाेन महिने उशिराने सुरुवात झाली आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून प्रयत्न सुरू आहेत.  

राज्यभरातून प्राप्त झाले ६९ हजार ३९१ अर्ज   nसाेमवार दि. ६ मे अखेर राज्यभरातून ६९ हजार ३९१ अर्ज प्राप्त झाले हाेते. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ७८१ अर्ज प्राप्त झाले आहेत. nत्यापाठाेपाठ नागपूर ७ हजार ८९९, नाशिक ४ हजार ९९९, ठाणे ४ हजार ७५६ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सर्वात कमी केवळ १५ पालकांनी अर्ज केला आहे.

शासनाच्या निर्देशाकडे लक्ष उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेबाबत आता राज्य शासनाकडून नेमके काय निर्देश दिले जातात, याबाबत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी वाट पाहत आहेत.

यंदा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही यंदा आरटीईअंतर्गत अर्ज करण्यासाठी दर वर्षीच्या तुलनेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. न्यायालयाने आरटीईतील बदलांना स्थगिती दिल्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळेल, यासाठी पालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा