शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नीट परीक्षा लेखी होणार की ऑनलाइन? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:06 IST

वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट लेखी म्हणजे पेन पेपरवर होणार की ऑनलाइन होणार, याबद्दलच्या निर्णयासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली. 

NEET UG Exam Latest Updates: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार नीट प्रवेश पूर्व परीक्षा यावर्षी कशी होणार, याची चर्चा आहे. केंद्र सरकारकडून परीक्षेच्या स्वरूपात बदल केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे. ऑफलाइन म्हणजे पेपर-पेन की ऑनलाइन घ्यायची याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा केली जाणार आहे. 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट यूजी पेन-पेपरने घ्यायची की, ऑनलाइन पद्धतीने घ्यायची, याबद्दल शिक्षण आणि आरोग्य मंत्रालय सातत्याने चर्चा करत आहेत. यासंदर्भातील निर्णय लवकरच होण्याची अपेक्षा आहे." 

धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी बोलताना ही माहिती दिली. शिक्षण मंत्रालय आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य मंत्रालय यांच्यात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत, असे प्रधान यांनी सांगितले. 

एनटीए फक्त प्रवेश पूर्व परीक्षा घेणार

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, २०२५ पासून एनटीए उच्च शिक्षण संस्थांसाठी प्रवेश पूर्व परीक्षाच घेईल. कोणतीही भरती परीक्षा घेणार नाही. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या रचनेत २०२५ मध्ये बदल होतील, १० नवीन पदे निर्माण करण्यात आली असून, परीक्षेतही सुधारणा केल्या जातील, असे प्रधान यांनी सांगितले. 

नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर केंद्र सरकारकडून बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे ही परीक्षा लेखी न घेता ऑनलाइन घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालexamपरीक्षाCentral Governmentकेंद्र सरकार