शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

एटीकेटी काेणाच्या फायद्याची, विद्यार्थ्यांच्या की शिक्षण संस्थांच्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:04 IST

एटीकेटी ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या हितासाठी जन्माला आली असे वरकरणी दिसते; परंतु तिच्या मुळाशी संस्थांच्या आर्थिक गरजा आणि व्यवस्थापकीय सोयी यांची छटा ठळकपणे जाणवते.

- डॉ. राजन वेळूकर माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठमारे चाळीस वर्षांपूर्वी विद्यापीठीय व्यवस्थेत एटीकेटी (अलाऊड टू कीप टर्म्स) हा प्रकार नव्हता. त्या काळी एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाला, तर त्याला कंपार्टमेंट स्कीमअंतर्गत पूरक परीक्षा द्यावी लागत असे. त्या विषयात पास झाल्यावरच पुढील वर्गात प्रवेश मिळे. ही पद्धत जे विद्यार्थी बहुतांश विषयात चांगले आहेत, पण एखाद्या विषयात कोणत्याही कारणास्तव कमी पडले, तर त्यांच्यासाठी विद्यार्थीकेंद्रित पद्धत होती, पण गुणवत्तेची हमी पण देणारी होती.सन १९८३नंतरचा काळ वेगळा ठरला. खासगी अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम झपाट्याने वाढले. हे अभ्यासक्रम चालवायचे असतील तर संस्थांना विद्यार्थ्यांच्या फीवरच अवलंबून राहावे लागायचे/लागते. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अनुतीर्ण झाले, संस्थांचा महसूल कमी झाला. व्यवस्थापन अडचणीत यायला लागले. त्याचवेळी अनेक महाविद्यालये उघडली आणि तुलनेने कमी शैक्षणिक क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू लागला. त्यांच्या दृष्टीने कठीण अभ्यासक्रम ओझे ठरू लागले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी आणि संस्थांनी एक तडजोडीचा फॉर्म्युला स्वीकारला. त्याला गोंडस नाव देण्यात आले – एटीकेटी. सुरुवातीला ही सवलत काही विषयांपुरती मर्यादित होती; पण विद्यार्थ्यांचा दबाव, आंदोल, मागण्या वाढत गेल्या व एटीकेटी पद्धत स्थिरावली. या प्रक्रियेतील एक प्रसंग मला आजही आठवतो. मी राजभवनात कार्यरत असताना नागपूर विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एटीकेटीसंदर्भात उग्र आंदोलन केले होते. निदर्शने, धरणे, विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान व अखेरीस पोलिसांचा लाठीचार्ज असा तो प्रसंग घडला. त्या घटनेची चौकशी करण्यासाठी मी स्वतः विद्यापीठात गेलो होतो. त्या भेटीत मला उमजले की एटीकेटी हा केवळ शैक्षणिक प्रश्न नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, त्यांच्या पालकांच्या अपेक्षांशी आणि संस्थांच्या आर्थिक अस्तित्वाशी निगडित असा बहुआयामी विषय होता.

अलीकडेच पुणे विद्यापीठातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गुणवत्तेबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवलीत. विद्यापीठांना ऑर्डीनन्समध्ये बदल करण्याचा अधिकार असला, तरी त्यासाठी शैक्षणिक परिषद व व्यवस्थापन परिषदेच्या प्रक्रियेतून जाणे आवश्यक आहे. आपात परिस्थितीत कुलगुरूंना आपल्या स्वाक्षरीने तात्पुरते आदेश कायद्यातील तरतुदीचा उल्लेख करून काढण्याचा अधिकार असतो. परंतु, नंतर त्यांना मान्यता घेऊन कायद्यातील तरतुदीनुसार ऑर्डीनन्सला घ्यावी लागते. ही काटेकोर प्रक्रिया वापरली गेली नसेल, तर पुणे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकाला कायदेशीर पाठबळ आहे, असे मानणे चुकीचे ठरेल.

गुणवत्तेशी तडजोड न करता अशी करता येईल उपाययोजनाविद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत कोणतीही तडजोड न करता ठोस उपाय योजले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी फक्त प्रतिष्ठा किंवा दबावामुळे नव्हे तर आवड व उत्कटता आणि कौशल्यांनुसार शिक्षणक्रम निवडणे गरजेचे आहे. कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर होतील. शैक्षणिक संस्थांचे नियमित गुणवत्ता परीक्षण करून त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. शिक्षकांना सततचे प्रशिक्षण आणि नवीन अध्यापन पद्धतींचे मार्गदर्शन देणे अत्यावश्यक आहे. अभ्यासक्रम डिझाइनपासून प्रशिक्षण व इंटर्नशिपपर्यंत इंडस्ट्रीचा सक्रिय सहभाग वाढवणे गरजेचे आहे. या उपाययोजनांनी विद्यार्थ्यांना दिशा मिळेल, पालकांचा विश्वास टिकेल आणि देशाला योग्य कौशल्यसंपन्न मानवसंपदा मिळेल.  

English
हिंदी सारांश
Web Title : ATKT: Boon for Students or Educational Institutions? An Overview

Web Summary : ATKT, initially a compromise, aided institutions financially. Quality suffered with relaxed standards. Experts suggest skill-based education, industry involvement, and teacher training for improvement. Compromising quality for student retention is detrimental.
टॅग्स :examपरीक्षा