शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

Vedantu आता देणार परीक्षेच्या निकालाची खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 1:54 PM

'वेद' या शब्दाचा ज्ञान असा अर्थ होतो तर  'तंतु' या शब्दाचा तंत्रज्ञान असा अर्थ निघतो. वेदान्तुने (Vedantu) मुलांना लाईव्ह ऑनलाईन शिक्षण देण्याकरिता ५००-हून अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षकांचं एक तंत्र तयार केलं आहे.

वेदान्तु (Vedantu) ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. प्रगती प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क असल्याचे वेदान्तुला खात्री आहे. मुलांना केवळ शिक्षण देणं हे वेदान्तुचे हेतू नाही, तर त्यांचे शैक्षणिक निकाल सुधारणं सुद्धा वेदान्तुचं उद्दिष्ट आहे. मुलं चांगलं करू शकतात असं जगातील बऱ्याच पालक आणि शिक्षकांना वाटतं पण मुलं निश्चितपणे चांगलं करू शकतातच याची खात्री वेदान्तुला वाटते. प्रयत्नांचं रुपांतर यशात करण्यासाठी वेदान्तुने आपल्या पहिल्या उपक्रमाची घोषणा जाहीर केली आहे. या उपक्रमाचं नाव आहे वेदान्तु इम्प्रूव्हमेंट प्रॉमिस (VIP).   वेदान्तुच्या दीर्घकालीन अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्यांना वेदान्तु इम्प्रूव्हमेंट प्रॉमिस चा (VIP) लाभ घेता येईल. वेदान्तुच्या (Vedantu) दीर्घकालीन कोर्सची कालावधी एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असून, इयत्ता सहावी ते बारावीत शिकत असलेले सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. यासोबतच JEE-Main आणि NEET-UG सारख्या प्रवेश परीक्षेचे तयारी करणारे विद्यार्थीदेखील यात सहभागी होऊ शकतात. 'वेद' या शब्दाचा ज्ञान असा अर्थ होतो तर  'तंतु' या शब्दाचा तंत्रज्ञान असा अर्थ निघतो. वेदान्तुने (Vedantu) मुलांना लाईव्ह ऑनलाईन शिक्षण देण्याकरिता ५००-हून अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षकांचं एक तंत्र तयार केलं आहे. वेदांतु मधील शिक्षकांस आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधाराने मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा अनुभव असल्याने वेदान्तुशी जुळलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल दर्जेची कामगिरी पार पाडली आहे.  वेदान्तुचे (Vedantu) दीर्घकालीन कोर्स, शिक्षण आणि तंत्रज्ञानाचे बदलते स्वरुप लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. या कोर्समध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह क्लासची कोणतीही मर्यादा नाही अर्थात असंख्य लाईव्ह सेशनचा फायदा, वेदांतुचे विद्यार्थी घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गातील काही ठराविक भाग पुन्हा पहावयाचे असल्यास, भूतकाळ मध्ये घडलेले क्लासचे रेकॉर्डिंगदेखील उपलब्ध आहेत. यामुळे कोणताही विद्यार्थी आधी झालेल्या क्लासमधील अभ्यास पुन्हा पाहून तो समजून घेऊ शकतो.

 प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष वेदान्तुच्या (Vedantu) शिक्षणधोरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. वेदान्तु आणि त्याचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची समस्या व्यक्तीगतरित्या समजून आणि त्याच्या प्रतिभेला योग्य उद्दिष्टा पर्यंत नेण्याच्या दृष्टीनं वेदान्तुच्या कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे. वेदान्तु प्रत्येक विद्यार्थ्याला क्लासमध्ये किंवा क्लासनंतर त्याच्या शंका दूर करण्याची संधी देतो. वेदान्तु इम्प्रूव्हमेंट प्रॉमिस च्या (VIP) क्लासरुमला रंजक करण्यासाठी प्रश्नोत्तरे आणि आकर्षक अध्ययन साहित्याचा वापर करण्यात येतो. इथे ऑनलाईन अभ्यास परस्परांमध्ये संवाद साधणारी असते. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक केवळ आपली प्रश्न-उत्तरं केवळ लिहूच शकत नाहीत, तर त्याबद्दलच्या छायाचित्रांची देवाणघेवाण देखील करू शकतात. ऑनलाईन अभ्यासात थ्रीडी चित्रं आणि ग्राफिक्सचा वापर केला जातो. त्यामुळे विद्यार्थी वर्गात सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित समजू शकतात. शिक्षक ऑडिओ-व्हिडीओ असाइनमेंट किंवा चाचण्या आपल्या विद्यार्थ्यांना पाठवू शकतात आणि त्यानंतर विद्यार्थी आपल्या मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने त्या चाचण्यांची उत्तरं देऊ शकतात, अशी माध्यमं वेदान्तुनं (Vedantu)तांत्रिक सहाय्यानंविकसित केली आहेत. वेदान्तु इम्प्रूव्हमेंट प्रॉमिसमध्ये (VIP) विद्यार्थ्यांचं मूल्यांकन आणि त्यांचा विकास व्यवस्थित जाणून घेण्यासाठी एक पद्धत तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पालक केवळ त्यांच्या मुलांची टप्प्येनिहाय कामगिरीच पाहू शकणार नाहीत, तर त्यासोबत त्यांचे कमकुवत दुवे देखील जाणून घेऊ शकतील. त्यामुळे या मुलांना अधिक उत्तमपणे तयार करण्यासाठीची रुपरेषा आखता येईल. यासाठी एकामापदंड परिक्षेची निर्मिती केली गेली आहे. पहिली मापदंड चाचणीप्रवेश घेतल्यानंतर ३० दिवसांच्या आत घेतली जाईल. त्यातून विद्यार्थ्यांच्या सुरुवातीच्या स्तराची माहिती मिळेल. मापदंड चाचण्यापूर्ण कोर्सदरम्यान घेतल्या जातात. कोर्सच्या अखेरीस विद्यार्थ्याच्या कामगिरीत सुधारणा करण्याची खात्री वेदान्तु इम्प्रूव्हमेंट प्रॉमिस ची (VIP) असते. वेदान्तु इम्प्रूव्हमेंट प्रॉमिस (VIP)च्या ऑनलाइन क्लासेससाठी खूप वेगवान इंटरनेट सेवेची आवश्यकता नाही. स्मार्टफोनवरही तुम्ही हे क्लासेस पाहू आणि ऐकू शकता. मुलांनी आत्तापर्यंत न अनुभवलेलं सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न वेदान्तुने (Vedantu) केला आहे.

 अलीकडच्या काळात असंही निदर्शनास आलं आहे की, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुलांच्या अभ्यासाचं मोठं नुकसान झालं आहे. काही शाळा पूर्णपणे बंद झाल्या, तर अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाइन शिक्षण घ्यावं लागलं. मुलं एका इयत्तेतून उत्तीर्ण होऊनपुढच्या इयत्तेत गेली खरी, पण त्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे पुढचा अभ्यासक्रम समजून घेताना अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. सहावी ते बारावीच्या मुलांसाठी अभ्यासाचा वेळ अत्यंत मौल्यवान असतो. आपण अभ्यासात मागे राहावं असं ना विद्यार्थ्यांना वाटतं, ना त्यांच्या पालकांना. म्हणूनच, आजच्या कठीण काळात कित्येक मुलांना मदतीची आवश्यकता आहे. अशा वेळी विद्यार्थी आणि पालकांना वेदान्तु इम्प्रूव्हमेंट प्रॉमिस (VIP) उपयुक्त ठरू शकतं. ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात वेदान्तुला (Vedantu) आपल्या यशा सोबतच मुलांच्या क्षमतेवरही पूर्ण विश्वास आहे. मुलांच्या कामगिरीमध्ये सुधारणा न दिसल्यास या योजने अंतर्गत आकारण्यात आलेलं संपूर्ण शुल्क परत करण्याची हमी वेदान्तु इम्प्रूव्हमेंट प्रॉमिस (VIP) देईल. त्यासाठी केवळ एक अट असेल. ती म्हणजे, या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांची, लाईव्ह क्लासेस आणि परीक्षांमध्ये किमान ७५ टक्के उपस्थिती असायला हवी. मुलांच्यायशाची पूर्ण जबाबदारी वेदान्तुची (Vedantu) असेल. मुलांच्या  हेगतिमान शैक्षणिक प्रगतीसाठी  नक्कीच एक वेगळे उपक्रम असणार कारण अन्य कोणतीही संस्था मुलांच्या यशाची या पातळीची खात्री देत नाही.