शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
3
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
4
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
5
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
6
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
7
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
8
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
9
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
10
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
11
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
12
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
13
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
14
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
15
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
16
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
17
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
18
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
19
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
20
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?

UPSC परीक्षेत अपयशी ठरलेल्या उमेदवारांनाही मिळणार नोकरी; आयोगाची नवीन योजना? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:27 IST

UPSC Pratibha Setu: लाखो उमेदवार दरवर्षी UPSC परीक्षा देतात, परंतु मोजकेच यशस्वी होतात.

UPSC Pratibha Setu: IAS किंवा IPS बनण्याचे स्वप्न पाहणारे लाखो उमेदवार दरवर्षी UPSC परीक्षा देतात, परंतु लाखोंपैकी मोजकेच उमेदवार यशस्वी होतात. अपयश पदरात पडूनही काहीजण पुन्हा जोमाने तयारीला लागतात, पण ज्यांचे वय संपले, त्यांच्यासाठी पुढची वाट खूप खडतर असते. एकतर ते कुठेतरी खासगी नोकरी करतात, किंवा व्यवसायाची वाट धरतात. दरम्यान, अशा उमेदवारांसाठी आता यूपीएससीने रोजगाराचा मार्ग सोपा केला आहे.

यूपीएससीने एक योजना आणली आहे, ज्याद्वारे मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणारे, परंतु उत्तीर्ण न होऊ शकलेल्या उमेदवारांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.यूपीएससीने 'प्रतिभा सेतू' नावाची योजना सुरू केली आहे. याद्वारे खाजगी आणि सरकारी संस्था त्या उमेदवारांशी थेट संपर्क साधू शकतील आणि त्यांच्या प्रतिभेचा योग्य वापर करू शकतील. म्हणजेच काय, तर त्यांना नोकरीच्या संधी दिल्या जातील.

दरम्यान, यूपीएससीची ही योजना नवीन नाही. पूर्वीदेखील यूपीएससी चांगल्या उमेदवारांची माहिती कंपन्यांना किंवा जिथे नोकऱ्या मिळू शकतात, तिथे पाठवत असे. आता उमेदवारांची सर्व माहिती प्रतिभा सेतू वेबसाइटवर उपलब्ध असेल. मंत्रालये, स्वायत्त विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी कंपन्या प्रतिभा सेतू पोर्टलवर उमेदवारांची माहिती मिळवू शकतील. यासाठी कंपनीला प्रथम नोंदणी करावी लागेल आणि कॉर्पोरेट ओळख क्रमांक (CIN) घ्यावा लागेल. प्रतिभा सेतूमध्ये अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

प्रतिभा सेतूवर उमेदवारांची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कंपन्यांना काय करावे लागेल?

Step 1: प्रतिभा सेतूवर जाण्यासाठी प्रथम गुगलवर upsconline.gov.in सर्च करा.

Step 2: तुम्ही त्यात सर्व तपशील वाचू शकता.

Step 3: यानंतर, लॉग-इन वर क्लिक करा.

Step 4: आता तुम्हाला नोंदणी पर्याय दिसेल.

Step 5: यामध्ये कंपनीला खाजगी संघटना पर्याय निवडावा लागेल.

Step 6: यानंतर सर्वप्रथम CIN क्रमांक जनरेट करावा लागेल, जो MCA पोर्टलद्वारे केला जाईल.

Step 7: यासाठी कंपनीचा आयडी MCA पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

Step 8: CIN क्रमांक जनरेट केल्यानंतर, तुम्हाला UPSC प्रतिभा सेतू वेबसाइटवर जाऊन CIN क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.

Step 9: सबमिट केल्यानंतर, कंपन्यांना पोर्टलवर उमेदवारांची माहिती देखील मिळेल.

या योजनेअंतर्गत, उमेदवारांचा बायोडेटा, ज्यामध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता आणि संपर्क तपशील समाविष्ट आहेत. UPSC ने म्हटले आहे की, अशा 10,000 हून अधिक उमेदवारांचा डेटा प्रतिभा सेतूवर उपलब्ध करून दिला जाईल.

या परीक्षांच्या उमेदवारांची माहिती उपलब्ध असेलयूपीएससीने म्हटले आहे की, नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, अभियांत्रिकी सेवा, संयुक्त भूगर्भशास्त्रज्ञ, संयुक्त संरक्षण सेवा, भारतीय आर्थिक सेवा / भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा आणि संयुक्त वैद्यकीय सेवेत अपयशी ठरलेल्या उमेदवारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाjobनोकरीEmployeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकार