शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

IAS, IPS होण्याची सुवर्णसंधी; UPSC ने जारी केली अधिसूचना, जाणून घ्या संपूर्ण तपशील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:16 IST

UPSC CSE 2025 Notification: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा 2025 ची अधिसूचना जारी केली आहे.

UPSC CSE 2025 Notification: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने आज(22 जानेवारी) नागरी सेवा परीक्षा 2025 ची अधिसूचना जारी केली आहे. यंदा एकूण 979 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यावेळी पदांची संख्या गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. उमेदवार 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी, या कालावधीत UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा(IPS), भारतीय वन सेवा (IFS), भारतीय परराष्ट्र सेवा(IFS) आणि इतर प्रतिष्ठित सेवांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. 

यापूर्वी जास्त जागा भरल्यादरम्यान, 2024 मध्ये UPSC ने 1,105 जागा भरल्या होत्या, तर 2023 मध्ये 1105 आणि 2022 मध्ये 1011 पदे भरण्यात आली होती. यंदा 979 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांपैकी 38 पदे अपंग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, UPSC CSE 2025 ची प्राथमिक परीक्षा 25 मे रोजी होणार आहे. पात्र उमेदार आजपासून 11 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.

पात्रता निकष: कोण अर्ज करू शकतो?UPSC नागरी सेवा परीक्षा 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी किमान 21 वर्षे असावे, तर 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1993 पूर्वी आणि 1 ऑगस्ट 2004 नंतर झालेला नसावा.

अर्ज फीसर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, महिला उमेदवार, SC/ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्याची गरज नाही. अर्ज केल्यानंतर उमेदवार 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणादेखील करू शकतात.

अर्ज कसा करावासर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.होम पेजवर दिलेल्या OTR टॅबवर क्लिक करा.आता नोंदणी करा आणि फॉर्म भरा.आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.फी भरा आणि सबमिट करा.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाGovernmentसरकारjobनोकरीEducationशिक्षण