शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गरिबीमुळे शिक्षण सुटले, 11 वर्षांनी 12वी पास केली अन् 42व्या वर्षी UPSCमध्ये मिळवले यश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 21:36 IST

UPSC परीक्षा पास करणाऱ्या 1016 पैकी शेवटचा उमेदवार. तिसऱ्या प्रयत्नात महेश कुमार यांनी मिळवले यश.

UPSC CSE Result List : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच परीक्षा उत्तीर्ण होतात. मंगळवारी(16 एप्रिल) UPSC CSE 2023 चा निकाल जाहीर झाला. यंदा एकूण 1016 उमेदवार पास झाले. दरम्यान, युपीएससीचा निकाल लागल्यानंतर सर्वजण टॉपर्सची चर्चा करतात, पण यादीत सर्वात शेवटी असलेल्या उमेदवाराची चर्चा होत नाही. आज आम्ही तुम्हाला या यादीतील शेवटचा उमेदवार महेश कुमार यांच्याबद्दल सांगणार आहोत.

मूळचे बिहारमधील मुजफ्फरपूरचे रहिवासी असलेले महेश कुमार यांनी यूपीएससीच्या यादीत शेवटून पहिला, म्हणजेच 1016 वा क्रमांक मिळवलेला. विशेष बाब म्हणजे, महेश कुमार सध्या शेखपुरा जिल्हा कोर्टात क्लर्क म्हणून काम करतात आणि नोकरी करत त्यांनी यूपीएससीचा अभ्यास करत 42 व्या वर्षी हे यश मिळवले आहे. महेश कुमार यांच्या या यशानंतर त्यांच्या कुटुंबात आणि सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महेश कुमार यांनी तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. 

11 वर्षांनी 12 वी पास केलीमहेश कुमार 1995 साली दहावी पास झाले, त्यावेळी ते शाळेत पहिले आले होते. पण घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. पण, शिक्षणाची आवड असलेल्या महेश यांनी 11 वर्षांनंतर, म्हणजेच 2008 साली 12 वीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. यानंतर 2011 साली त्यांनी पदवी घेतली आणि 2013 साली टीईटी (TET) परीक्षा उत्तीर्ण होऊन कंत्राटी शिक्षक बनले. यानंतर 2018 साली त्यांनी कोर्टाची परीक्षा देऊन क्लर्क म्हणून काम सुरू केले.

यानंतर 2023 मध्ये बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरली. नोकरी करत असताना महेश कुमार यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. दिवसभर शिक्षकाची नोकरी आणि रात्री अभ्यास, असा महेश यांचा दीनक्रम होता. यूपीएससीच्या पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश आले, पण ते खचले नाहीत. अभ्यास कायम ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात वयाच्या 42 व्या वर्षी यश संपादन केले. त्यांचा यूपीएससीच्या यादीत शेवटचा क्रमांक असला तरी ते आता ते समाजात क्लास वन अधिकारी म्हणून वावरणार आहेत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाGovernmentसरकारjobनोकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी