शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

UPSC Topper: 'सर्व बाबा महाकालचा आशीर्वाद'! चेस-क्रिकेट खेळून केली तयारी; मुलांमधील UPSC टॉपर ऐश्वर्य म्हणतो... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 23:34 IST

UPSC result 2021 : "परीक्षा देण्याचा हा माझा चौथा प्रयत्न होता. यात मी यशस्वी झालो, हे सर्व बाबा महाकाल यांचेच आशीर्वाद आहेत. मी लवकरच बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला जाईन."

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) सोमवारी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. या परिक्षेत पहिले ३ क्रमांक मुलींनी पटकावले. तर उज्जैनच्या ऐश्वर्य वर्मा (Aishwarya Verma UPSC Topper) याने UPSC 2021 नागरी सेवा परीक्षेत AIR 4 (All India Rank) मिळवत सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला. खरे तर त्याच्या नावामुळे, सुरुवातीला सर्वांनाच तो एक महिला उमेदवार वाटला. मात्र, नंतर तो पुरुष उमेदवार असून मध्य प्रदेशातील उज्जैनचा असल्याचे स्पष्ट झाले.

ऐश्वर्य म्हणतो 'सर्व बाबा महाकाल यांचे आशीर्वाद' -सध्या ऐश्वर्य आपल्या कुटुंबीयांसोबत उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहतो. बाबा महाकाल यांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैनमध्ये ऐश्वर्यचा जन्म झाला आहे. तो म्हणाला, परीक्षा देण्याचा हा माझा चौथा प्रयत्न होता. यात मी यशस्वी झालो, हे सर्व बाबा महाकाल यांचेच आशीर्वाद आहेत. मी लवकरच बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला जाईन.

परीक्षेच्या तयारीसंदर्भात बोलताना ऐश्वर्य म्हणाला, रोज 16-16 तास अभ्यास करणे ही एक भ्रामक गोष्ट आहे. UPSC चा अभ्यासक्रम खूप मोठा आहे, अशा स्थितीत लहान, मध्यावधी आणि दीर्घकालीन योजना करून संपूर्ण तयारी करायला हवी. याच बोरबोर त्याने सांगितले, की त्याला चेस आणि क्रिकेट खेळायला आवडते. तो आपल्या तयारीच्या वेळी विश्रांती घेण्यासाठी चेस आणि क्रिकेट खेळत असे. असे केल्याने अनावश्यक ताण कमी होतो.आई-वडील आणि मित्रांना दिलं यशाचं श्रेय -मध्य प्रदेशातील उज्जैनमधील नीमच आणि कटनी येथून शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या ऐश्वर्य वर्माने UPSC 2021 मध्ये मिळालेल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना आणि मित्रांना दिले आहे. तो म्हणाला,  'माझ्या आई-वडिलांनी आणि मित्रांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. ते प्रत्येक परीक्षा आणि मुलाखतीपूर्वी माझे मनोबल वाढवत होते.' ऐश्वर्यने 2017 मध्ये उत्तराखंडमधील पंत नगर कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून बीईची पदवी मिळवली आहे.

करोनामुळे दिल्ली सोडावी लागली -ऐश्वर्य दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. मात्र, तेथे करोनाच्या उद्रेकामुळे त्याला दिल्ली सोडावी लागली. यानंतर त्याने बरेली आणि उज्जैनमध्ये येऊन तयारी केली.

 

 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थीexamपरीक्षाMadhya Pradeshमध्य प्रदेशEducationशिक्षण