आणखी तीन रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 18:30 IST2020-06-06T18:15:34+5:302020-06-06T18:30:24+5:30
रूग्णांची संख्या २१८ वर पोहोचली

dhule
धुळे - शहरातील आणखी तीन रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. दण्डेवाला बाबा नगर परिसरातील दोन तर अभय कॉलेज जवळील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या २१८ वर पोहोचली आहे. धुळे शहरातील पॉजीटीव्ह रूग्णांची संख्या १३८ झाली आहे. त्यापैकी ७७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.