शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन गणित शिकविणे आहे अवघड; मुख्याध्यापक, शिक्षकांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:09 IST

ऑनलाइन शिक्षण अधिक प्रभावशाली करण्यासाठी एनसीईआरटीकडून काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

मुंबई : कोविड-१९च्या सद्य:परिस्थितीत शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या आदेशानुसार आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, या दरम्यान आॅनलाइन शिक्षण घेत असताना, विशेषत: गणित आणि विज्ञान यांसारख्या विषयांमध्ये विद्यार्थी, पालकांनाच नाही, तर ७५% हून अधिक मुख्याध्यापकांनाही अडचणी येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

गणितात अनेक सिद्धांत, समीकरणे असतात, ती फळ्यावर टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना समजावून शिकवावी लागतात. विज्ञानातले प्रयोगही प्रत्यक्ष दाखविल्याशिवाय समजून घेणे शक्य नसल्याने हे विषय आॅनलाइन शिकविणे शक्य नसल्याचे मत शिक्षक, मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

ऑनलाइन शिक्षण अधिक प्रभावशाली करण्यासाठी एनसीईआरटीकडून काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठी आधी केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यानुसार, केंद्रीय विद्यालयाच्या ७६% मुख्याध्यापकांना, ३९% विद्यार्थ्यांना, नवोदय विद्यालयाच्या ७१% मुख्याध्यापकांना, ६०% शिक्षकांना आणि ३३% विद्यार्थ्यांना आॅनलाइन गणित शिकणे, शिकविणे कठीण वाटते. सीबीएसई मंडळाच्या ७८% मुख्याध्यापकांना, तर ४५% विद्यार्थ्यांना आॅनलाइन गणित अवघड वाटत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांना भाषा विषय शिकण्यातही अडचण येत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.आॅनलाइन शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या टीव्ही, पुस्तके, लॅपटॉप अशा साधनांमध्ये रेडिओ माध्यमाचा वापर सगळ्यात कमी होत असलेला दिसून येत आहे. आॅनलाइन शिक्षणादरम्यान केंद्रीय विद्यालयाच्या ३९%, नवोदयच्या ३३ तर सीबीएसईच्या ४५% विद्यार्थ्यांना गणित अवघड जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सीबीएसई मंडळाच्या १२%हून अधिक विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणम्हणजे ओझे वाटते, तर ३९% विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणामुळे समाधानी असल्याची बाब समोर आली आहे.

आॅनलाइन शिक्षणाचा त्रास होत असल्याचे मत केंद्रीय विद्यालयातील ६% विद्यार्थ्यांनी व्यक्त केले, तर ३३% विद्यार्थी यामुळे समाधानी आहेत. २४% विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण कठीण वाटते. नवोदय विद्यालयातील २५% विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण कठीण वाटते, तर ३३% विद्यार्थी यामुळे समाधानी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.अभ्यासासाठी मोबाइलचा वापरआॅनलाइन शिक्षण अधिक प्रभावशाली करण्यासाठी एनसीईआरटीने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठी आधी केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, सीबीएसईचे ८२%, केंद्रीय विद्यालयाचे ८४%, तर नवोदय विद्यालयाचे ८७% विद्यार्थी अभ्यासासाठी मोबाइलचा वापर करीत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

टॅग्स :onlineऑनलाइन