शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनो २७ जूनपर्यंत करा आपले प्रोफाइल अपडेट, बदल्यांच्या पहिल्या टप्प्याच्या कार्यवाहीसाठी वाढीव वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 12:15 IST

Education News: सध्या राज्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या कार्यवाहीचा पहिला टप्पा सुरू असून, त्याची मुदत २० जून रोजी संपली. याअंतर्गत शिक्षकांना प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक होते.

मुंबई : सध्या राज्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या कार्यवाहीचा पहिला टप्पा सुरू असून, त्याची मुदत २० जून रोजी संपली. याअंतर्गत शिक्षकांना प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक होते. मात्र, प्रणालीमध्ये अजूनही बऱ्याच शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट केले नसल्याची माहिती शासनाला मिळाली आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाकडून या कार्यवाहीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, आता शिक्षकांना येत्या २७ जूनपर्यंत आपल्या प्रोफाइलमध्ये आवश्यक बदल करण्यास वेळ मिळणार आहे.

जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या यावर्षी ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली तयार केली आहे. दरम्यान, शिक्षकांना स्वतःची ऑनलाइन प्रोफाइल तयार करून ती शिक्षण विभागाच्या पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. राज्यभरातील बदलीस पात्र शिक्षकांनी आपल्या प्रोफाइल तयार करून त्या अद्ययावत केल्या असल्या तरी काही त्रुटींमुळे प्रोफाइलमध्ये काही बदल राहिले आहेत. शिक्षकांना त्या त्रुटी दूर करण्यासाठी २० जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. मात्र, त्यातही ही कार्यवाही पूर्ण न झाल्याने या मुदतीत वाढ करून २७ जूनपर्यंत शिक्षकांना मुदतवाढ दिली आहे. बदलीच्या अनुषंगाने त्रुटी असलेल्या शिक्षकांच्या प्रोफाइल अपडेट करणे बाकी असल्याने बदल्यांना शिक्षण विभागाने एक आठवड्याची मुदतवाढ दिली.

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती आवश्यक   शिक्षकांच्या बदल्या करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील निर्णय तत्काळ घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची तरतूद आहे.   या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाचे उपसचिव वळवी यांनी राज्य समन्वयक, विभागीय समन्वयक आणि जिल्हा समन्वयकांच्या नियुक्तीच्या सूचना जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याशिवाय अवघड क्षेत्राविषयीही काही सूचना निर्मित करण्यात आल्या आहेत. शिक्षक बदल्यांच्या कार्यवाहीचा पुढील टप्पा पार पडताना या सूचनांच्या अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षक