शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सिम्बॉयसिस एमबीए प्रवेश आता 'सिम्बायोसिस नेशनल ॲप्टिट्यूड टेस्ट २०२४' च्या माध्यमातून खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:04 IST

सिम्बॉयसिस एमबीए प्रोग्रामसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया 'सिम्बॉयसिस नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट २०२४' च्या माध्यमातून अधिकृतरित्या सुरू करण्यात आली आहे.

MBA Addmission : सिम्बॉयसिस एमबीए प्रोग्रामसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया 'सिम्बॉयसिस नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट  २०२४' च्या माध्यमातून अधिकृतरित्या सुरू करण्यात आली आहे. भारतात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी ५ ऑगस्ट २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणी प्रक्रिया, पात्रता निकष आणि इतर आवश्यक माहितीसाठी इच्छुकांनी ऑफिशिअल एस एन ए पी वेबसाइट येथे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कृपया नोंद घ्या, परीक्षेसाठीचे शहर आणि तारीख प्रथम फॉर्म घेणाऱ्यास प्रथम सेवा तत्वावर देण्यात येतील.

२०२४ साठीची एसएनएपी कम्प्युटर-बेस्ड टेस्ट  तीन वेगवेगळ्या तारखांना होईल: ८ डिसेंबर २०२४ (रविवार), १५ डिसेंबर २०२४ (रविवार)  आणि २१ डिसेंबर २०२४ (शनिवार.) एसएनएपी २०२४ चे बहुप्रतीक्षित निकाल ८ जानेवारी २०२५ (बुधवार) रोजी जाहीर होतील.

या आगामी परीक्षेतून महत्त्वाकांक्षी उमेदवारांना एकाच अर्जातून सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) अंतर्गत १७ संस्थांमधील २७ अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

“सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये उद्योगक्षेत्रासाठी सज्ज, नवोन्मेषी आणि समस्यांवर तोडगा काढण्यात माहीर असे प्रोफेशनल्स तयार करण्यावर आमचा विश्वास आहे. व्यवस्थापनातील उत्तम करिअरच्या संधीसोबतच अतुलनीय शिक्षण मिळेल अशा संस्थेत प्रवेश मिळवण्याचा हमखास मार्ग म्हणजे एसएनएपी. या संधीचा लाभ घेत आमच्यासोबत यशोशिखराच्या मार्गावर जाण्याची संधी मिळवण्यासाठी आम्ही महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देतो,” असे सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)चे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण म्हणाले.

ही परीक्षा भारतभरात ८० शहरांमध्ये घेतली जाईल आणि उमेदवारांना तीन संधी दिल्या जातील. “बेस्ट ऑफ थ्री” तत्वानुसार यातील सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जातील. प्रत्येक वेळेसाठी २२५० रु. नोंदणी शुल्क असेल. तसेच अर्ज केलेल्या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी अतिरिक्त १००० रु. भरावे लागतील.

सिम्बॉयसिस नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट (एसएनएपी)साठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किंवा राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेतून किमान ५० टक्के (अनूसुचित जाती/जमातींसाठी ४५ टक्के) गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. शेवटच्या वर्षात असणारे अंडरग्रॅज्युएट विद्यार्थीही अर्ज करू शकतात. मात्र, त्यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळवणे गरजेचे आहे. परदेशी विद्यापीठातील इच्छुक उमेदवारांकडे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) चे समतूल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (डिम्ड युनिव्हर्सिटी)शी संलग्न विविध ख्यातनाम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग एसएनएपीमुळे खुला होतो. यात विविध प्रकारचे एमबीए अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एसएनएपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत करणाऱ्या ख्यातनाम संस्थांमध्येएसआईबीएम पुणे, एसआईसीएसआर, एसआईएमसी, एसआईआईबी, एससीएमएचआरडी, सिम्स, सिडटीएम, एससीआईटी, एसआईओएम, एसआईएचएस, एसआईबीएम बेंगलुरु, एसएसबीएफ, एसआईबीएम हैदराबाद, एसएसएसएस, एसआईबीएम नागपुर, एसआईबीएम नोएडा आणि स्कॅन्स. या संस्थांचा समावेश आहे. बिझनेस आणि मॅनेजमेंटच्या करिअरसाठी महत्त्वाकांक्षी प्रोफेशनल्सना या परीक्षेच्या माध्यमातून एक नवा मार्ग आखता येतो.

५० वर्षांचा संपन्न वारसा जपणाऱ्या सिम्बॉयसिस इंटरनॅशनला (अभिमत विद्यापीठ) मानाचा एनएएसी ए++ दर्जा देण्यात आला आहे. एनआयआरएफ २०२३ रँकिंगमध्ये विद्यापीठ विभागात या विद्यापीठाला ३२ वे स्थान देण्यात आले होते. जगभरातील विद्यापीठांमध्ये क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्सतर्फे या संस्थेला ६४१-६५० या दरम्यान स्थान देण्यात आले आहे आणि एम्प्लॉयर रेप्युटेशनसाठी जगभरात ३१ वे स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, क्यूएस इंडिया रँकिंग्समध्ये सिम्बॉयसिसला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम खासगी विद्यापीठाचे स्थान देण्यात आले आहे.

पुणे, हैदराबाद, नागपूर, नाशिक, नोएडा आणि बेंगळुरु येथील कॅम्पसेसच्या माध्यमातून ही संस्था दर्जेदार शिक्षण आणि सर्वंकष विकास संधी उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपत भविष्याला आकार देत आहे.

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) भविष्यातील नेतृत्व तयार करण्यास बांधिल आहे. त्यासाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आणि सर्वंकष विकासाच्या संधी ते देऊ करतात.

टॅग्स :Educationशिक्षण