शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Success Story: लहानपणी घरोघरी पेपर टाकले, अनाथाश्रमात वाढला; अखेर मेहनतीच्या जोरावर IAS पदी वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:06 AM

ही कथा आहे IAS अधिकारी अब्दुल बी नासर यांची, ज्यांनी केरळमधील अनाथाश्रमात १३ वर्षे शिक्षण घेतले.....

UPSC Success Story: देशातील सर्वात अवघड मानली जाणारी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून आयएएस होण्यासाठीचा अनेकांचा संघर्ष तुम्ही वाचला, ऐकला किंवा पाहिला असेल. अशा संघर्षामुळे आपल्यालाही एक प्रकारची उर्जा मिळते आणि काहीतरी करून दाखवण्याची उर्मी जागी होती. आज आपण अशाच एका व्यक्तीच्या आयुष्यातील खडतर प्रवासानंतर मिळालेल्या यशाची माहिती जाणून घेणार आहोत. या व्यक्तीचा संघर्ष वाचला तर आपसुकपणे तुम्ही त्याचे भरभरून कौतुक कराल. ही कथा आहे IAS अधिकारी अब्दुल बी नासर यांची, ज्यांनी केरळमधील अनाथाश्रमात १३ वर्षे शिक्षण घेतले. 

अब्दुल बी नासर यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरविल्याने त्यांच्या कुटुंबाचे जगणे खूप कठीण झाले होते. त्यावेळी त्यांना लहानपणापासून काम करण्याची सवय करावी लागली. ते आणि त्याची भावंडे अनाथाश्रमात असताना त्यांची आई घरगुती मदतनीस म्हणून काम करत होती. नासर यांनी १३ वर्षे अनाथाश्रमात राहून शालेय शिक्षण पूर्ण केले.

वयाच्या १० व्या वर्षी हॉटेलमध्ये काम-

अब्दुल नासर यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केले. शालेय शिक्षण घेत असताना अनेकदा त्यांनी अनाथाश्रमातून पळून काढला होता. पण नंतर माघारी येत त्यांनी त्यांचा अभ्यास पूर्ण केला. अत्यंत गरिबी असूनही नासर यांनी कशीबशी बारावी पूर्ण केली. त्यानंतर थालास्सेरी येथील शासकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. खडतर काळात नासर यांनी मुलांची शिकवणी घेतली तसेच फोन ऑपरेटर म्हणून काम केले. त्याचबरोबर सकाळी पेपर टाकण्याचेही त्यांनी काम केले.

पहिली नोकरी १९९४ मध्ये-

पदव्युत्तर शिक्षणानंतर अब्दुल नासर यांना केरळच्या आरोग्य विभागात अधिकारी म्हणून पहिली नोकरी मिळाली. पण ते या नोकरीवर समाधानी नव्हते. २००६ मध्ये राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते उपजिल्हाधिकारी झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांना केरळचे सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले.

२०१७ मध्ये आयएएस अधिकारी -

अब्दुल नासर यांना २०१७ मध्ये आयएएस अधिकारी म्हणून बढती देण्यात आली होती. २०१९ मध्ये ते कोल्लम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनले. मात्र, याआधी त्यांनी सरकारमध्ये गृहनिर्माण आयुक्त म्हणूनही काम केले आहे. अशाप्रकारे अब्दुल नासर यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर अनाथाश्रमापासून आयएएसपर्यंतचा प्रवास केला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडupscकेंद्रीय लोकसेवा आयोगKeralaकेरळ