शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हेळसांड अजून किती काळ चालणार?, स्वतंत्र नियमावलीकडे शाळांचे दुर्लक्ष 

By सीमा महांगडे | Updated: April 11, 2022 06:01 IST

आईच्या कुशीनंतर मुलं ही सगळ्यात जास्त त्यांच्या शाळेमध्ये शिक्षकांच्या सहवासात सुरक्षित असतात.

सीमा महांगडे 

आईच्या कुशीनंतर मुलं ही सगळ्यात जास्त त्यांच्या शाळेमध्ये शिक्षकांच्या सहवासात सुरक्षित असतात. पण ही संकल्पना बदलत्या काळासह पुसट होऊ लागल्याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. शाळेमध्येच विद्यार्थ्यांवर वाढत्या अत्याचाराच्या घटना, स्कूलबस बेपत्ता होण्याच्या घटना, शाळेतील कमी केलेली शिपाई काका-मावशी अशी पदे, यामुळे विद्यार्थी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. मुलं शाळांमध्ये सुरक्षित नसतील, तर प्रत्यक्ष शिक्षणाने ती सृजनशील कशी होतील, असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिला जात आहे.

ज्ञानाच्या मंदिरात जिथे आयुष्य कसे जगावे, याचे धडे विद्यार्थी घेतात, तिथेच त्यांच्यावर अत्याचाराची घटना घडून शाळा व्यवस्थापनाला त्याची माहिती ही होत नसेल, तर याहून अधिक निष्काळजीपणाची सीमा असू शकणार नाही. आजही विद्यार्थीसंख्येचा एक मोठा भाग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणि अनुदानित किंवा पालिका शाळांमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र यातील कुठल्याच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीसारख्या आत्यवश्यक यंत्रणेची सुविधा नाही. यावरून राज्याच्या अर्थसंकल्पाचा किती भाग आपण शिक्षणावर आणि शिक्षणाच्या सोयी-सुविधांवर खर्च करतो, याचा अंदाज यायला वेळ लागणार नाही. 

पोक्सो कायदा काय आहे? किती शाळांमधून त्याची माहिती विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचते, याची तपासणी किंवा आढावा शिक्षण विभागाकडून होतो का, यावर प्रश्नचिन्ह आहे. या गोष्टीच विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, तर त्याचा उपयोग होणार तरी कसा? समस्या सुटणार तरी कशा? विद्यार्थी सुरक्षितता ही केवळ कोणा एकाची जबाबदारी नसून,  शाळा व्यवस्थापन, शिक्षक-पालक या सगळ्यांची ती आहे.

स्वतंत्र नियमावलीकडे शाळांचे दुर्लक्ष - स्कूलबससाठी राज्य सरकार व शिक्षण विभागाची स्वतंत्र नियमावली अस्तित्वात असतानाही विद्यार्थी सुरक्षितता वाऱ्यावरच आहे. - मग शाळेत विद्यार्थ्यांना पालकांनी नेमक्या कोणाच्या विश्वासावर पाठवावे, हा प्रश्न साहजिकच पालक प्रतिनिधींमधून उमटणे यात काहीच गैर नाही. - महत्त्वाचे म्हणजे शाळा व्यवस्थापनकडून विद्यार्थी सुरक्षिततेच्याबाबतीत हेळसांड होऊनही अशा शाळा केवळ आश्वासने देऊन सहजासहजी कारवाईविना स्वतःचा बचाव करतात. शिक्षण विभागाची नियमावली आणि निर्णय असेच पायदळी तुडविले जाणार असतील, तर मग शाळांना ते लागूच का केले जातात, असा प्रश्नही पडतोच.

टॅग्स :MumbaiमुंबईSchoolशाळाEducationशिक्षण