शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘आता महाराष्ट्रातही शाळा सुरू करा’; मागणी वाढू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 07:45 IST

#आताशाळासुरूकरा : सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना मुले शाळेत जाण्यासाठी आतुर झाली आहेत.  दीर्घ काळ मुलांना शाळेपासून दूर ठेवणे त्यांच्या मानसिक व शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही, असे मत युनिसेफ, युनेस्को आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही नोंदविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे मुलांचे मानसिक, शारीरिक, शैक्षणिक आरोग्य धोक्यात आल्याने लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत आहे. या विषयावर परिसंवाद, चर्चा, सोशल मीडियावर #आताशाळासुरूकरा अशी मोहीम सातत्याने सुरू झाली आहे. दिल्लीमध्ये शाळा सुरू करण्यात येणार असल्याच्या निर्णयानंतर या मागणीला जोर मिळाला आहे आणि महाराष्ट्रातही शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षणतज्ज्ञ, पालक व अभ्यासक करीत आहेत.

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना मुले शाळेत जाण्यासाठी आतुर झाली आहेत.  दीर्घ काळ मुलांना शाळेपासून दूर ठेवणेत्यांच्या मानसिक व शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही, असे मत युनिसेफ, युनेस्को आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही नोंदविले आहे. जनजीवन सुरळीत सुरू आहे, मुले गटागटाने खेळत आहेत. शाळा मात्र गेले दीड वर्ष बंदच आहेत. यासाठी शाळा सुरू झाल्या पाहिजेत, असा सूर शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यातून उमटत आहे.

‘युनिसेफ’च्या मते, शाळा बंद असल्याने मुलांवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. बालविवाह, बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे. शाळा सुरू करण्यास विलंब केल्यास त्रासदायक ठरू शकते. अमेरिकेत सुमारे ९० टक्के विद्यार्थी सरकारी शाळांमध्येच शिकतात. तिथेही १६ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. गुजरात, दिल्ली, कर्नाटकसह अनेक राज्ये शाळा सुरू करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील मागच्या दीड ते दोन वर्षांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून शासनाने लवकर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा.- वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या