शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

SSC & HSC Exams: बारावीत बसविले डमी विद्यार्थी, मुंबई विभागात दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकारांची २३ प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 08:25 IST

SSC & HSC Exams: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘शाळा तेथे केंद्र’ या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली. मात्र, त्याचा गैरफायदा घेत बारावीत तोतया विद्यार्थी बसविण्याचे प्रकार घडले.

- सीमा महांगडे मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘शाळा तेथे केंद्र’ या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली. मात्र, त्याचा गैरफायदा घेत बारावीत तोतया विद्यार्थी बसविण्याचे प्रकार घडले. काही परीक्षार्थींनी उत्तरपत्रिकेची पाने फाडल्याचाही प्रताप केला. मुंबई विभागातील दहावी-बारावीच्या २३ गैरमार्गांच्या प्रकरणांची चौकशी होणार आहे.

मुंबई विभागीय मंडळात बारावीची एकूण १८, तर दहावीची ५ गैरप्रकरणे आढळल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. कॉपीची प्रकरणे घडू नयेत यासाठी विभागीय मंडळाने परीरक्षक, भरारी पथके, विशेष बैठी पथके नेमली होती.  बारावीच्या विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्राच्या पेपरला वैयक्तिक कॉपीची ४ प्रकरणे आढळली. यातील साहित्य अद्याप मंडळाकडून जमा केले गेलेले नाही. त्यानंतर  वाणिज्य शाखेच्या ‘ओसी’ विषयाच्या पेपरला मुंबई विभागात ४ गैरमार्ग प्रकरणे आढळली आहेत. यात तोतया विद्यार्थी परीक्षेस बसल्याचे समोर आले आहे.  दहावीच्या हिंदी विषयाच्या पेपरला २ गैरमार्ग प्रकरणे आढळून आली. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे शेवटचे पान फाडण्यात आल्याचे आढळले.

विभागीय समितीकडून चौकशीमुंबई विभागीय मंडळाकडून लवकरच एक विभागीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अहवालानंतर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गैरमार्ग प्रकरणे  कॉपी करताना पकडले (पुस्तक, गाईडची छायांकित पृष्ठे, हस्तिलिखित पाने जप्त)  मोबाईलमधून कॉपी  तोतया विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट उत्तरपत्रिकेची पाने फाडली

टॅग्स :Educationशिक्षणssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाMumbaiमुंबई