शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएसची दुसरी फेरी; ७,६९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 07:12 IST

राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या यंदा ८,३३८ जागा असून त्यासाठी सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविल्या जात असलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत केवळ ८५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आतापर्यंत एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील ७,६९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून ६३६ जागा रिक्त आहेत. 

राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या यंदा ८,३३८ जागा असून त्यासाठी सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या फेरीत ६,८४८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर दुसऱ्या फेरीत सीईटी सेलने विद्यार्थ्यांना १,४११ जागांचे वाटप केले. या फेरीत कट ऑफमध्ये फारशी घट झाली नाही. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले नाही. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळाल्या त्यातील केवळ ८५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर ५४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. यात ११ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी सरकारी कॉलेजांमध्ये ४,९६९ जागा आहेत. तर खासगी कॉलेजांमध्ये ३,३६९ जागा आहेत. 

तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक ऑनलाईन नोंदणी ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान करता येईल.तात्पुरती गुणवत्ता यादी ९ ऑक्टोबरला.तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती ९ ऑक्टोबरला जाहीर होईल.कॉलेजांचे पसंती क्रमांक १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरदरम्यान नोंदविता येतील.तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १५ ऑक्टोबरला जाहीर होईल.विद्यार्थ्यांना १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरदरम्यान कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : MBBS Second Round: 7,699 Admissions; Vacancies Remain for Third Round

Web Summary : MBBS second round sees 851 new admissions, totaling 7,699 statewide. 636 seats remain vacant. Third round schedule announced: registration October 6-8.
टॅग्स :doctorडॉक्टर