शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:47 IST

RRB JE Recruitment 2024 : सरकारी नोकरी, खासकरुन रेल्वेतील नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

RRB JE Recruitment 2024 : सरकारी नोकरीची, खासकरुन रेल्वेतीलनोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती जाहीर झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे, अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही अद्याप अर्ज केलेला नसेल, तर रात्रीपर्यंत 11.59 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. या भरती प्रक्रेयेत ज्युनिअर इंजीनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट पदे भरली जाणार आहेत. 

30 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती, तर आज(29 ऑगस्ट) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही आज रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज भरू शकता. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. फी भरल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फेरबदलासाठी 30 ऑगस्ट 2024 ते 9 सप्टेंबर 2024 पर्यंत करेक्शन विंडो खुली असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार RRB rrbapply.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज भरू शकता. 

रिक्त जागा किती आहेत? रेल्वेने 7951 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यापैकी 17 पदे केमिकल सुपरवायजर/ रिसर्च अँड मेटालर्जिकल सुपरवायजर/ रिसर्चचे आहेत. पण, ही पदे फक्त गोरखपूरसाठी असतील. उर्वरित 7934 पदांमध्ये कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंटसह केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक यांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादावेगवेगळ्या पदांची पात्रता वेगळी आहे, ज्याची तपशीलवार माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. 1 जानेवारी 2025 रोजी वयाची 18 ते 33 वर्षे पूर्ण करणारे सर्व उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

फी किती आहेफी भरणे केवळ ऑनलाइन मोडद्वारे केले जाऊ शकते. एससी, एसटी, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक, माजी सैनिक आणि ईबीसी प्रवर्गातून येणाऱ्यांना 250/- रुपये शुल्क भरावे लागेल. इतर सर्व प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रियाही परीक्षा संगणकावर आधारित असेल, जी दोन टप्प्यांत घेतली जाईल. दोन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. परीक्षा होईपर्यंत नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासत रहावे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेGovernmentसरकारjobनोकरी