शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 09:17 IST

पुढील महिन्यापर्यंत आणखी विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील, अशी आशा विद्यापीठाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरुवात होऊन दोन महिने उलटल्यानंतरही अद्याप केवळ १०,१६९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या प्रवेशासाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यातून पुढील महिन्यापर्यंत आणखी विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील, अशी आशा विद्यापीठाला आहे.

नोकरी अथवा अन्य कारणांमुळे उच्च शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाईन माध्यमातून शिक्षण पूर्ण करण्याची संधी असते. कोरोनापूर्वी विद्यापीठातील पूर्वीच्या आयडॉलच्या दूरस्थ अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षात या दूरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या घटली आहे. यंदा २० सप्टेंबरपर्यंत १०,१६९ विद्यार्थ्यांनी सीडीओईच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रम

एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम.कॉम. (अडव्हान्स अकाउंटन्सी), एम.कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एसी. (गणित) एम.एससी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एससी (संगणकशास्त्र) एमएमएस एमसीए.

या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी आणि इंग्रजी), बी. कॉम. (कॉमर्स, अकाऊटंसी आणि बिझनेस मॅनेजमेंट), बी.कॉम. (अकाऊंट अँड फायनान्स), बीएससी (माहिती तंत्रज्ञान), बीएससी (संगणकशास्त्र)

गेल्यावर्षी २०२४-२५ मध्ये सीडीओईच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांना केवळ १०,४६९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते, तर त्याआधीच्या वर्षी हा आकडा १८,७६० एवढा होता.

 

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठStudentविद्यार्थीEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय