शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, शिकायचे तरी कसे? शाळांमध्ये शिक्षकच नाहीत; पालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये ७०० हून अधिक पदे रिक्त

By सीमा महांगडे | Updated: August 22, 2022 08:14 IST

यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील प्राथमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या समायोजनासाठी कृती आरखडा जाहीर केला

सीमा महांगडेमुंबई :

यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील प्राथमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या समायोजनासाठी कृती आरखडा जाहीर केला असून, पालिकेच्या आठ माध्यमांच्या शाळांमध्ये आणि मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मिळून जवळपास ८०० शिक्षक पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वाधिक म्हणजे २५९ पदे रिक्त असून, समायोजनाच्या कार्यक्रमात ही २० टक्के पदे कायम रिक्त ठेवण्याचा निर्णय पालिका शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. मुंबईतील मराठी शाळा संपण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे आणखी पाऊल असल्याची टीका शिक्षक संघटना आणि मराठी भाषा प्रेमींकडून होत आहे.

मराठी शाळांना शिक्षकच नाहीतएकीकडे सीबीएसई, आयसीएसई आयबी मंडळाच्या शाळा उघडून दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा पालिका शिक्षण विभागाकडून केला जात असताना तेथे ३० टक्के कायमस्वरूपी रिक्त पदे ठेवून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, मुंबईमध्ये सुरू केलेल्या खासगी मराठी प्राथमिक शाळांना १५ वर्षे अनुदान दिले जात नाही आणि महापालिकेने सुरू केलेल्या मराठी शाळांना शिक्षकच दिले जात नाहीत, अशी परिस्थिती पालिका शिक्षण विभागात आहे; त्यामुळे मराठी शाळा टिकणार तरी कशा, असा प्रश्न मराठी शाळाप्रेमी विचारत आहेत.

शिक्षणाचा दर्जा घसरणार    खासगी व कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या शिक्षकांना प्रतितास १५० रुपये (दररोज कमाल सहा तास) मानधन दिले जाणार आहे.     कंत्राटी पद्धतीने काम करणारे शिक्षक आणि शिक्षणाचा दर्जा काय असणार याबद्दल इतर तज्ज्ञांकडून ही शंका उपस्थित करण्यात येत आहे. 

शिक्षकच करताहेत लिपिकाचे काममुंबईमधील ४९ अनुदानित माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकांची पदे १० वर्षे रिक्त असून शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने शिक्षकच लिपिक व सेवकाचे काम करीत असल्याचे वास्तव शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मांडले आहे. सर्वाधिक मराठी माध्यमांतील शाळांमध्ये मराठीची गळचेपी थांबणार कधी?

माध्यम    आवश्यक    कार्यरत    एकूण रिक्तमराठी     १३६९    १११०    २५० हिंदी    १८९५    १८२८    ६७ उर्दू     १८७६    १७३९    १३७ गुजराती    ११०    १२८    (-१८)तामिळ     १०४    १०८    (-४)तेलगू     २९    २५    ४कन्नड    १०५    ७९    २६ इंग्रजी     ९८०    ८८५    ९५ पब्लिक स्कूल ७५५     ५३३     २२२

मराठी माध्यमातील प्राथमिकची  शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांना थेट इंग्रजी माध्यमात इयत्ता नववी व दहावीच्या वर्गांमध्ये अध्यापनासाठी पाठवण्यात आले आहे. याचबरोबर मुख्याध्यापकपदी नियुक्त केलेले आहे. अशा प्रकारे पालिकेचा शिक्षण विभाग कायद्याचे उल्लंघनच करीत आहे.  १५० उमेदवार पात्र ठरूनही केवळ शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले म्हणून त्यांना नियुक्तीपासून रोखले जाणे हा संबंधित उमेदवारांवर अन्याय आहे.- शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद, मुंबई

मुलांच्या भवितव्याशी खेळणे कधी थांबणार? मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार मग ते आधीचे असो की आताचे; हे शाळेच्या प्रश्नांबाबत अजिबात गंभीर दिसत नाही, हे खेदाने म्हणावे लागते. शिक्षक आमदारांनी अधिवेशनात प्राधान्यक्रम तपासून, प्रश्नोत्तरांच्या पुढे जाऊन हे प्रश्न तातडीने सुटण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.- सुशील शेजुळे, मराठी अभ्यास केंद्र संलग्न मराठी शाळा संस्थाचालक संघ, महाराष्ट्र.

टॅग्स :Educationशिक्षणMumbaiमुंबई