शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यात चुका, संदिग्धता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 09:17 IST

शिक्षणतज्ज्ञांच्या चर्चेत पुनर्लेखनाची एकमुखी मागणी

मुंबई : महाराष्ट्राने सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांच्या बाबतीत देशाचे नेतृत्व केले आहे. त्याचे प्रतिबिंब राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यात उमटलेले दिसत नाही. तसेच, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे तयार केलेल्या राज्याच्या आराखड्यात अनेक चुका आणि त्रुटी आहेत. त्यामुळे तो संदिग्ध, समजण्यास कठीण आहे.

असा आराखडा अभिप्रायासाठी  वापरणे म्हणजे सर्वांचाच वेळ वाया घालवण्यासारखे आहे. त्यामुळे हा आराखडा सरकारने मागे घ्यावा आणि नव्याने समित्या स्थापन करून त्याचे पुनर्लेखन करावे, अशी भूमिका यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचातर्फे आयोजित शिक्षण कट्टा या चर्चेत घेण्यात आली.

राज्य अभ्यासक्रम आराखड्यावरील चर्चेत मंचाचे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे, बालभारतीच्या माजी विद्यासचिव धनवंती हर्डीकर, शिक्षण अभ्यासक किशोर दरक, माजी शिक्षण संचालक भाऊ गावंडे, बसंती रॉय, सूर्यकांत कुलकर्णी, भाऊसाहेब चासकर, सुभाष मोरे, सुशील शेजुळे, महेंद्र गणपुले आदींनी सहभाग घेतला.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात सर्व बाबी सविस्तर आणि योग्य पद्धतीने मांडल्या आहेत. राज्य अभ्यासक्रम आराखड्यात त्याचे योग्य भाषांतर व्हायला हवे होते. मात्र, यात अनेक महत्त्वाच्या बाबी गाळल्या आहेत. हा आराखडा फक्त मराठी माध्यमाच्या शाळांना विचारात घेऊनच केलेला दिसतो. राज्यातील अनेक भाषा माध्यमांचा विचार यात दिसत नाही. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार आपण महाराष्ट्रात नेमके काय करणार आहोत, याचे चित्र त्यात उमटत नाही.- डॉ. वसंत काळपांडे

हे राष्ट्रीय आराखड्याचे सुमार दर्जाचे भाषांतर आहे. हा खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आपल्या लोकशाही देशात संविधानाच्या तात्त्विक चौकटीला जे महत्त्व आहे तेच शिक्षणात राज्य अभ्यासक्रम आराखड्याला आहे. परंतु, तो गांभीर्याने तयार झालेला दिसत नाही. तो मागे घेऊन त्याचे पुनर्लेखन करावे आणि मग तो अभिप्रायार्थ ठेवावा.- धनवंती हर्डीकर

टॅग्स :Educationशिक्षण