शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षण: ‘मीडिअम’ आणि ‘मेथड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 23:51 IST

शिक्षणाची पद्धती अचूक असेल, तर माध्यम कोणते आहे याने फारसा फरक पडत नाही, पडू नये !

ऐपतवाल्या वर्गाने गेली दोन-तीन दशके आपल्या मुलांना प्रथम कम्प्युटर व नंतर स्मार्टफोन ही माध्यमे दिल्याने त्यांच्या मुलांनी शैक्षणिक प्रगतीत जागतिक विक्रम केल्याचे दिसत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी तंत्रवैज्ञानिकदृष्ट्या कितीही अद्ययावत ‘मीडिअम’ वापरले तरी ‘मेथड’ योग्य नसल्यास शिक्षण होत नाही व मेथड अचूक असेल तर कोणतेही मीडिअम वापरले तरी शैक्षणिक निष्पत्तीत फरक पडत नाही हे वैज्ञानिक सत्य ध्यानात घ्यायला हवे. मुलांपर्यंत तयार व्हिडिओ स्वरूपातील माहिती पोहोचवण्याची चढाओढ आपल्याला जिंकायची नाहीय. त्यांना त्यांच्या ज्ञानरचनेत साहाय्य, मार्गदर्शन होईल अशा पद्धतीने कृतींची मांडणी करत, अनुभवांची रेलचेल करत अर्थशोधन व अर्थबांधणी करायला प्रवृत्त करायचे आहे. ज्ञानरचना ही जितकी वैयक्तिक प्रक्रिया आहे तितकीच ती सामाजिक प्रक्रिया आहे. त्यामुळे घरी एकट्याने बसून स्मार्टफोनवर शिक्षकांची व्याख्याने ऐकून ती कशी करता येईल? त्यासाठी शिक्षकांच्या, वर्गमित्रांच्या सान्निध्यात गटातील, वर्गातील आणि शाळेतील शारीरिक, बौद्धिक, भावनिक, वैचारिक क्रिया व आंतरक्रियांची गरज आहे.महाराष्ट्रातील ९७.५ टक्के शालेय शिक्षकांकडे स्मार्टफोन आहेत हे एका पहाणीत समोर आले आहे. शासकीय किंवा शिक्षकांच्या सामायिक व विषयवार संघटनांच्या इ-लर्निंग पोर्टलवरून शिक्षकांना स्वत: तयार केलेले इ-लर्निंग साहित्य आपल्या स्मार्टफोनवरून इतर शिक्षकांशी शेअर करता येईल. तसेच स्मार्टफोनचा प्रभावी वापर शालेय शिक्षकांच्या दैनंदिन प्रशिक्षणासाठी करणे अत्यावश्यक व अपरिहार्य आहे. त्यांना नवनवीन उपक्रमांचे परस्परात शेअरिंग करता येईल. काही उत्साही शिक्षकांमध्ये तसे काही प्रमाणात घडतेही आहे.अकरावी-बारावीच्या व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे वय, जबाबदारीची जाणीव, शारीरिक व मानसिक परिपक्वता व निकड लक्षात घेता त्यांच्या शिक्षणात स्मार्टफोन, इ.चा समुचित वापर स्वागतार्ह आहे. त्यांना शासनाने स्मार्टफोन दिल्यास भेदभाव न होता सर्वांना उच्च गुणवत्तेची इ-शैक्षणिक प्रक्रिया त्यावर उपलब्ध करून देता येईल. इंटरनेटमुळे आज बहुतेक विषयांची प्रचंड माहिती उपलब्ध आहे. मुलांना ती सर्च व क्युरेट करायला शिकवले पाहिजे. ती वर्गातून देण्याची गरज उरलेली नाही. व्याख्यान इतरांना उपद्रव न होता एकट्याने ऐकण्या-पहाण्याची गोष्ट असल्याने ती घरी स्मार्टफोनवर पूर्ण करता येईल. वर्गात एवढी सुपीक डोकी एकत्र येतात; पण ती एकाचेच व्याख्यान ऐकतात. एकत्र येऊनही त्यांचा परस्परांना उपयोग होत नाही ही हास्यास्पद गोष्ट आहे. आता वर्गातला वेळ अनेकांच्या सहभागाने करण्याच्या ज्ञानरचनेला देता येईल. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी ज्या कृती व अंतरक्रिया आवश्यक असतात त्यांना पुरेसा वेळ मिळेल. जसे की मुक्तोत्तरी प्रश्नांची वेगवेगळी व्यक्तिनिष्ठ उत्तरे स्वतंत्र विचार करून, प्रश्नाचे नीट विश्लेषण करून व सर्जनशील अभिव्यक्ती साधत वर्गासमोर देणे, तर्क, वादविवाद, चर्चा, मतप्रदर्शन, भिन्न मतांविषयी आदर, कळीचे प्रश्न निर्भयपणे उपस्थित करता येणे व शिक्षकांच्या मदतीने गटाकडून उत्तरे मिळवणे, प्रयोगशाळेत शोध, निरीक्षणे, नोंदी, निष्कर्ष, गट-प्रकल्पांतून सर्जनशील निर्मिती अशा ‘उच्च’ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी वेळ मिळेल. केवळ माहितीचे आदानप्रदान म्हणजे उच्चशिक्षण नव्हे ! माहितीचे समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोजन करण्याच्या संधी देते ते उच्चशिक्षण. माहितीच्या उपयोजनातून समाजाला उपयुक्त व उत्पादक कामातूनच खरीखुरी ज्ञाननिर्मिती होते. उत्पादक काम आणि सैद्धांतिक ज्ञान यांचा सुरेख संगम, त्यांची घट्ट वीण म्हणजे उच्चशिक्षण. अस्तित्वात असलेल्या ज्ञानाला आव्हान द्यायला शिकवते, त्याच्या कक्षा विस्तारायला शिकवते ते उच्चशिक्षण.आता माहिती तंत्रविज्ञानाच्या योग्य वापराने ते साध्य करता येईल. पूर्वीची तूट भरून काढता येईल.(शब्दांकन : मुक्ता चैतन्य)विवेक सावंतचीफ मेंटॉर, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड