शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र देशात आघाडीवर; प्रशिक्षित शिक्षकांत महिलांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:04 IST

महाराष्ट्रात प्रशिक्षित शिक्षकांची संख्याही वाढल्याचा फायदाही विद्यार्थ्यांना होताना दिसत असल्याचे यूडायस अहवालातून समोर आले आहे

मुंबई - गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होताना दिसत आहे. राज्यात शाळांची संख्या किंचित कमी झाली असली तरी शिक्षकांची संख्या पाच हजारांनी वाढली आहे. त्यामुळे एका शिक्षकावर अनेक विद्यार्थ्यांचा येत असलेला भार कमी झाला आहे.

महाराष्ट्रात प्रशिक्षित शिक्षकांची संख्याही वाढल्याचा फायदाही विद्यार्थ्यांना होताना दिसत असल्याचे यूडायस अहवालातून समोर आले आहे. वीज, पाणी, शौचालय यांसारख्या मूलभूत सोयी बहुतेक शाळांत उपलब्ध असल्या, तरी संगणक-इंटरनेटची कमतरता आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी गळती ही अजूनही चिंतेची बाब आहे.

प्राथमिक स्तरावरही स्त्रीशक्तीचाच भरणा...महाराष्ट्रात महिला शिक्षकांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. २०२२-२३ मध्ये पुरुष शिक्षकांचे प्रमाण ५० टक्के तर महिला शिक्षकांचे प्रमाण ४९ टक्के होते.२०२३-२४ मध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण ५०.५ टक्क्यावर तर २०२४-२५ मध्ये हे प्रमाण ५१ टक्क्यांवर गेले आहे. प्राथमिक स्तरावर महिला शिक्षकांची संख्या अधिक असून, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर पुरुष शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे.

संपूर्ण देशात गुणवत्तेतदेखील  महाराष्ट्रच अग्रेसर...शिक्षकांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यातील ९५ ते ९७ टक्के शिक्षक प्रशिक्षित असून बहुतेकांकडे व्यावसायिक पात्रता आहे. विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टाशी जवळपास मिळते-जुळते आहे. २०२४-२५ मध्ये संगणक आणि इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर शक्य झाला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTeacherशिक्षक