शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक जिवानींची यशोगाथा; 4 वेळा UPSC दिली, तीनदा पास झाले; IPS-IAS दोन्ही पदे मिळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:32 IST

दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, मात्र मोजक्याच उमेदवारांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होते.

UPSC EXAM : दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, मात्र मोजकेच पास होऊन अधिकारी होतात. काही उमेदवारांना यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात, तर काहीजण एकदाही उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. काही उमेदवार असेही आहेत, जे एक-दोन नव्हे, तीनदा यूपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाबद्दल सांगणार आहोत, ज्याने 4 वेळा UPSC परीक्षा दिली अन् आपल्या मनासारखे पद मिळवले.

गुजरातचे रहिवासी असलेले कार्तिक जिवानी UPSC परीक्षेद्वारे IPS अधिकारी झाला, पण त्यांचे IAS होण्याचे स्वप्न होते. म्हणूनच त्यांनी आपला अभ्यास तसाच सुरु ठेवला. 

IT मुंबईतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगगुजरातच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक जिवानीने आठवी इयत्तेपर्यंत गुजराती माध्यमातून शिक्षण घेतले. यानंतर त्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला आणि बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर जेईई मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षा देऊन आयआयटी मुंबईत प्रवेश मिळवला. येथून त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.

दुसऱ्या प्रयत्नात IPS इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यानंतर कार्तिकने 2016 मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात तो अपयशी ठरला. पण हार न मानता, त्याने पुढची दोन वर्षे मेहनत घेतली आणि 2019 मध्ये दुसऱ्याच प्रयत्नात अखिल भारतीय स्तरावर 94 वा क्रमांक मिळवला. कार्तिकचा आयएएस फक्त दोन रँकने चुकला, मात्र त्याची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली.

चौथ्या प्रयत्नात IAS     आयपीएस प्रशिक्षण सुरू केल्यानंतरही जिवानी यांनी आयएएसची तयारी सुरूच ठेवली. त्यांनी 2019 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात 84 वा रँक मिळवला, पण आयएएस पद मिळाले नाही. अखेर, 2020 मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांनी 8 वा रँक मिळवला आणि या रँकसह कार्तिक जिवानी IAS अधिकारी झाले. 

दिवसातून 10 तास अभ्यास करुन मिळवले यश कार्तिक जीवनी दररोज 10 तास अभ्यास करायचे. त्यांचा बहुतांश अभ्यास रात्रीच होत असे. ते केवळ पुस्तकांवर अवलंबून राहिले नाही, तर त्यांनी ऑनलाइन उपलब्ध साहित्याचा वापर केला आणि अनेक नोट्स तयार केल्या. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी खऱ्या अर्थाने कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले, तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीGujaratगुजरात