शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

IIT मुंबई कॅम्पस प्लेसमेंट; यंदा 22 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांची नोकरी, सरासरी पॅकेजही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 16:25 IST

IIT Bombay Placements 2024 : 2023-2024 च्या प्लेसमेंट सेशनमध्ये जपान, तैवान, युरोप, यूएई, सिंगापूर, यूएसए, नेदरलँड आणि हाँगकाँग येथील विविध कंपन्यांचा समावेश आहे.

IIT Bombay Placements Branch Wise: भारतातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (III) बॉम्बे/मुंबई येथे नुकताच प्लेसमेंट ड्राइव्ह पार पडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पॅकेज वाढले आहे, पण नोकरी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या 1,516 विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदा केवळ 1,475 विद्यार्थ्यांनाच कॅम्पसमधून नोकरी मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, IIT बॉम्बे/मुंबई प्लेसमेंट 2024 मध्ये सरासरी पॅकेजमध्ये 7.7% ची वाढ होऊन, 23.50 लाख रुपये प्रतिवर्ष झाले आहे. विशेष म्हणजे, 22 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळाली आहे. यंदा  78 जणांना आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या आहेत, ज्यात जपान, तैवान, युरोप, यूएई, सिंगापूर, यूएसए, नेदरलँड आणि हाँगकाँग येथील विविध कंपन्यांचा समावेश आहे. 

यंदा B.Tech साठी 83.39 टक्के प्लेसमेंट, M.Tech साठी 83.5 टक्के आणि MS रिसर्चसाठी 93.33 टक्के प्लेसमेंट नोंदवले गेले. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगला सर्वाधिक 232 जॉब ऑफर मिळाल्या, तर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 230 ऑफर्ससह दुसऱ्या स्थानावर आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग 229 ऑफरसह तिसऱ्या स्थानावर आहे. इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्राने सर्वाधिक नोकऱ्या ऑफर केल्या. 

अहवालानुसार, या वर्षी फायनान्स क्षेत्रातील 33 वित्तीय सेवा कंपन्यांकडून 113 ऑफर आल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, मोबिलिटी, 5G, डेटा सायन्स आणि ॲनालिटिक्स या क्षेत्रांमध्येही वेगाने भरती झाली आहे. 

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षणjobनोकरी