शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

इंटरनेट असेल, तर शिक्षकांना कोणकोणते मार्ग वापरता येतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 23:48 IST

आभासी वर्गात बसणे सध्यातरी मुलांना मजेचे वाटतेय कारण एरवी जो मोबाइल किंवा कॉम्प्युटर द्यायला पालक कचरतात तो सहजी मुलांच्या हातात पडतो.

ज्या ठिकाणी इंटरनेटची उपलब्धता चांगली आहे तिथे व्हिडिओ आणि आॅडिओ कॉन्फरन्सिंग हा समकालिक संवादाचा पर्याय वापरता येतो. एकाच वेळी शिक्षक व विद्यार्थी हे काही विशिष्ट अ‍ॅप्सद्वारे एकमेकांशी बोलू, बघू शकतात. अशा आभासी वर्गात बसणे सध्यातरी मुलांना मजेचे वाटतेय कारण एरवी जो मोबाइल किंवा कॉम्प्युटर द्यायला पालक कचरतात तो सहजी मुलांच्या हातात पडतो. त्यामुळे त्याचा गैरवापर मुले करत नाही ना याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.समकालिक संपर्कासाठी जे अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत त्यात सध्या लोकप्रिय आहे ते झूम. त्याला गुगल मीट किंवा सिस्को वेबेक्स आणि इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप्स पुढच्या ४-६ महिन्यांसाठी तरी मोफत आहेत. झूम वापरायला अतिशय सोपे असले तरी त्याच्या मोफत आवृत्तीला सलग बैठकीसाठी चाळीस मिनिटांची मर्यादा आहे. तशी मर्यादा इतर अ‍ॅप्सना एक तास किंवा जास्त आहे. झूम व वेबेक्स वर एका वेळी सहभागी होणाऱ्यांची संख्या शंभर आहे तर गुगल मीटवर ती दोनशे पन्नासपर्यंत नेता येते.डेटा सुरक्षिततेच्या दृष्टीने गुगल मीट व वेबेक्स हे झूमपेक्षा जास्त स्थिरता देतात. याशिवाय मायक्रोसॉफ्ट स्काइप आणि टीम असेही पर्याय आहेत. कायमस्वरूपी मोफत असे ‘ओपन सोर्स’ या प्रकारातही अनेक पर्याय आहेत - पैकी ‘जिटसी मीट’ हे जास्त वापरले जाते. याविषयी जास्त माहिती व तपशील इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे.जलद इंटरनेट उपलब्ध असले तरी आधी सुचवल्याप्रमाणे मुलांचा ‘स्क्रीनटाइम’ कमीत कमी ठेवून आॅफलाइन शिकणे जास्त कसे होईल यावर शिक्षकांनी भर देणे अत्यावश्यक आहे. अनेक मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी व संस्थांनी याबाबत वेळोवेळी धोक्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘आॅफलाइन’ शिकण्यात विद्यार्थ्यांची कृतिशीलता वाढेल यासाठी भवतालच्या परिसरातून त्यांना काय शिकता येईल याचा अंदाज घेऊन तसे काम दिल्यास विद्यार्थ्यांनाही ते नीरस वाटणार नाही. याचे अनेक पर्याय या आधीच्या टिपणात आपण वाचले असतील. एरवी ‘बिनभिंतीं’च्या शाळेत (निसर्ग व भवतालातून) शिकण्याचे महत्त्व आपण जाणतोच. ते या निमित्ताने प्रत्यक्षात उतरवण्याची ही उत्तम संधी आहे. या ‘कमी-आॅनलाइन-जास्त-आॅफलाइन’ शिक्षणात पालकांचा सहभाग वाढल्याशिवाय मुलांचे शिकणे परिणामकारक होणार नाही.सतत ‘स्क्रीनकडे लक्ष दे अभ्यास कर...’ अशा नुसत्या सूचना न देता अधून मधून अशा आभासी वर्गात काय चालते ते पालकांनी पाहावे म्हणजे आपल्या मुलांना काय मदत हवी आहे हे त्यांना उमगेल; शिवाय मुलांशी चर्चा करून त्यांना शिकण्यात सजगतेने मदतही करता येईल.- अंजली चिपलकट्टी, समीर शिपूरकरंल्ल्नं’्रूँ्रस्र@ॅें्र’.ूङ्मे