Sanjita Mohapatra IAS Love Story: एक प्रसिद्ध म्हण आहे, 'प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक स्त्री असते'. असे मानले जाते की, कोणत्याही व्यक्तीच्या यशामागे त्याची आई, पत्नी, बहीण किंवा मित्राचा त्याग आणि पाठिंबा असतो. हीच गोष्ट अनेक यशस्वी महिलांनाही लागू होते. IAS अधिकारी संजीता महापात्रा यांनी अनेक मुलाखतींमध्ये आपल्या यशाचे श्रेय पती बिस्व रंजन मुंडारी आणि सासरच्या मंडळींना दिले आहे.
संजीता महापात्रा ओडिशाच्या राउरकेला येथील रहिवासी आहेत. त्यांनी ICSE बोर्डातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. नागरी सेवेत करिअर करायचे, असे त्यांनी लहानपणीच ठरवले होते. 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी JEE परीक्षा उत्तीर्ण केली आणि IIT कानपूर (IIT Kanpur Admission) मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.
पतीने दिली खंबरी साथखडतर प्रवासात तुमचा हात धरून तुमची साथ देणारे कोणी सापडले तर मार्ग सुकर होतो. संजीता महापात्रा यांना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बरीच वर्षे लागली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या 4 प्रयत्नांमध्ये त्या अपयशी ठरल्या. पण त्यांची हिम्मत डगमगली नाही. यावेळी पती बिस्व रंजन मुंडारी आणि सासरच्यांनी खूप साथ दिली.
चार अपयशानंतर मिळाले यशसंजीता महापात्रा यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणतेही कोचिंग लावले नाही. सुरुवातीला राउरकेला स्टील प्लांटमधील नोकरीसोबतच त्यांनी इंटरनेटच्या मदतीने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्यानंतर नोकरी सोडून पूर्णवेळ अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान, त्यांनी ओडिशा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला होता, परंतु यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे त्याचे ध्येय होते.
डहाणूत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरतअखेर तो क्षण आलाच अन् संजीता महापात्रांनी UPSC परीक्षेत 2019 मध्ये देशात 10 वा क्रमांक मिळवला. UPSC नागरी सेवा परीक्षेतील त्यांचा पर्यायी विषय समाजशास्त्र होता. त्यांचे पती बिस्व रंजन मुंडारी हे भारतीय रिझर्व्ह बँकेत व्यवस्थापक आहेत. तर, संजीता महापात्रा सध्या महाराष्ट्रातील डहाणू येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.