लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने देशातील सर्व वैद्यकीयमहाविद्यालयांतील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन ‘स्टुडंट फीडबॅक फॉर्म’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून त्यांच्या महाविद्यालयातीलशिक्षण आणि एकूण शैक्षणिक अनुभवाबाबत अभिप्राय (फीडबॅक) घेतला जाणार आहे. हा फीडबॅक पूर्णपणे गोपनीय आणि अनामिक स्वरूपात असेल. त्यामुळे महाविद्यालयाचा एकूण कारभार कसा आहे, याबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही भीती न बाळगता मत नोंदवता येईल.
विद्यार्थ्यांकडून घेतला जाणारा फीडबॅक केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि अंतर्गत आढाव्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रमाणिक मत नोंदवावे, असे आवाहन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केले आहे. या फॉर्ममध्ये वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित विविध महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अध्यापनाची गुणवत्ता, क्लिनिकल प्रशिक्षण व रुग्णांशी संपर्क, प्रयोगशाळा आणि विच्छेदन कक्ष, प्रात्यक्षिक प्रशिक्षण, सामुदायिक औषधशास्त्र व ग्रामीण प्रशिक्षण यांचा समावेश आहे.
सुरक्षिततेलाही प्राधान्य
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्यांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. रॅगिंगविरोधी उपाययोजना, तक्रार निवारण प्रणाली, मानसिक आरोग्य सहाय्य, कॅम्पस संस्कृती, विद्यार्थी कल्याण आणि सहशालेय उपक्रम याबाबतही विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध हा ऑनलाइन फॉर्म राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि प्रामाणिकपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.
देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना उद्देशून या संदर्भातील परिपत्रक नुकतेच वैद्यकीय आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणातील उणिवा ओळखून त्यावर सुधारणा करण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Web Summary : The National Medical Commission (NMC) has launched online feedback forms for MBBS students to anonymously evaluate their colleges. The feedback will focus on academics, safety, and infrastructure to improve medical education quality and promote student-centered learning. Colleges are urged to encourage student participation.
Web Summary : राष्ट्रीय चिकित्सा आयोग (एनएमसी) ने एमबीबीएस छात्रों के लिए गुमनाम रूप से अपने कॉलेजों का मूल्यांकन करने के लिए ऑनलाइन प्रतिक्रिया फॉर्म लॉन्च किए हैं। प्रतिक्रिया अकादमिक, सुरक्षा और बुनियादी ढांचे पर केंद्रित होगी ताकि चिकित्सा शिक्षा की गुणवत्ता में सुधार हो सके और छात्र-केंद्रित शिक्षा को बढ़ावा मिले। कॉलेजों से छात्रों की भागीदारी को प्रोत्साहित करने का आग्रह किया गया है।