शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

सर्वोच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी! पगार 44,900 रुपये; असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 18:24 IST

सर्वोच्च न्यायालयातील या पदासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 15 फेब्रुवारी 2021 पासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे. नोकरी मिळणाऱ्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे इंग्रजीत भाषांतर करावे लागेल. (Supreme Court Recruitment 2021)

नवी दिल्ली - आपल्याला भाषेची चांगली जाण असेल आणि त्या भाषेचा आपण अभ्यास केला असेल, तर आपल्याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात कोर्ट सहाय्यक/कनिष्ठ अनुवादक पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. (Job Opportunities In The Supreme Court)

या पदांवर नियुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला लेखी परीक्षा आणि मुलाखतीत यशस्वी व्हावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे इंग्रजीत भाषांतर करावे लागेल. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नोटिफिकेशन आणि अॅप्लीकेशन फॉर्मच्या लिंक्स पुढे देण्यात आल्या आहेत. 

पदाचे नाव – कोर्ट सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक)पदांची संख्या – 30वेतनश्रेणी – दरमहा 44,900 रुपये (लेव्हल-7 प्रमाणे इतर भत्त्यांसह पगार मिळेल.)

Government Job : UCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अशी आहे पात्रता आणि अटीशर्तीभाषा निहाय रिक्त पदे? -इंग्रजी ते हिंदी – 05आसामी – 02बंगाली – 02तेलगू – 02गुजराती – 02उर्दू – 02मराठी – 02तमीळ – 02कन्नड – 02मल्याळम – 02मणिपुरी – 02उडिया – 02पंजाबी – 02नेपाळी – 01

Sarkari Naukri : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळविण्याची संधी, 22 फेब्रुवारीच्या आधी करा अर्ज

आवश्यक पात्रता -इंग्रजी आणि संबंधित भाषेतील पदवीधर असावा. ट्रान्सलेशनचा डिप्लोमा अथवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे. तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार वयात सूट देण्यात येईल. 

असा करा अर्ज -सर्वोच्च न्यायालयातील या पदासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 15 फेब्रुवारी 2021 पासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे. 13 मार्च 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये, तर एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी 250 रुपये आहे.

संबंधित लिंक -

Supreme Court Junior Translator Job Notification साठी येथे क्लिक करा.Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.SC च्या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयjobनोकरीdelhiदिल्लीCourtन्यायालय