Sarkari Naukri : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळविण्याची संधी, 22 फेब्रुवारीच्या आधी करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 02:04 PM2021-02-08T14:04:39+5:302021-02-08T14:07:47+5:30

बीएचईएलने काढलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 300 पदांसाठी भरती होईल. यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. (Golden Opportunity To Get Government Job Without Exam)

Sarkari naukri in BHEL for 300 various post, Golden Opportunity To Get Government Job Without Exam | Sarkari Naukri : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळविण्याची संधी, 22 फेब्रुवारीच्या आधी करा अर्ज

Sarkari Naukri : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळविण्याची संधी, 22 फेब्रुवारीच्या आधी करा अर्ज

Next

नवी दिल्ली -नोकरीसाठी सध्या सर्वच क्षेत्रांत जबरदस्त कॉम्पीटीशन सुरू आहे. अशा परिस्थितीत परीक्षा न देता सरकारीनोकरी मिळवणं, म्हणजे एक स्वप्नच झालं आहे. मात्र, यातच आता भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (BHEL) एक सुंदर संधी उपलब्ध करून दिली आहे. BHELने ट्रेड अॅप्रेन्टिस शिवाय, वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी योग्य उमेदवारांची सरळ भरती होणार आहे.  या सरकारी नोकरीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा असणार नाही. (Sarkari naukri in BHEL)

बीएचईएलने काढलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 300 पदांसाठी भरती होईल. यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 22 फेब्रुवारी, 2021पर्यंत असेल. यासंदर्भात आपण नोटिफिकेशन पाहू शकता.

कसा कराल अर्ज? -
बीएचईएल ट्रेड अॅप्रेंटिस पदावर अर्ज करण्यासाठी आपल्याला एनएपीएस पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. येथे नोंदणी झाल्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. या रजिस्ट्रेशन नंबरच्या सहाय्याने आपण बीएचईएल भोपाळच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकता. 

अर्ज करण्यासाठी पात्रता -
कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10वीची  परीक्षा पास केलेली असावी. संबंधित ट्रेडमधून आयटीआय डिप्लोमा कोर्स झालेला असावा. उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असावे. तसेच आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल. 

या पदांसाठी मागविण्यात आले आहेत अर्ज -
या भरती प्रक्रियेत, इलेक्ट्रिशनची 80 पदे, फिटरची 80 पदे, वेल्डरची 20 पदे, टर्नरची 20 पदे, मशीनिस्टची 30 पदे, ड्राफ्ट्समॅन (मॅकॅनिक)ची 5 पदे, इलेक्ट्रॉनिक्स (मॅकॅनिक)ची 5 पदे, COPA/PASAA ची 30 पदे, कारपेंटरची 5 पदे, प्लम्बरची 5 पदे, मॅकॅनिक मोटर वाहनची 5 पदे, मशीनिस्ट (ग्राईंडर)ची 5 पदे, ब्रिकलेयर (एमईएस)ची 5, तर पेंटरची 5 पदे, अशा एकूण 300 पदांसाठी भरती होईल.

Web Title: Sarkari naukri in BHEL for 300 various post, Golden Opportunity To Get Government Job Without Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.