शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 1.4 लाख, लगेच करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 20:35 IST

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे.

Govt Job:सरकारीनोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने प्रोबेशनरी इंजिनीअर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी अकाउंटंट पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. ही कंपनी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. ही सैन्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तयार करते.

वयोमर्यादा आणि महत्त्वाच्या तारखाप्रोबेशनरी इंजिनीअर आणि प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 25 वर्षे आणि प्रोबेशनरी अकाउंटंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 4 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली असून, उमेदवार 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रताया तिन्ही विभागात एकूण 232 पदे भरली जाणार आहेत. प्रोबेशनरी इंजिनिअरच्या 205 जागांवर भरती होणार आहे, तर प्रोबेशनरी ऑफिसरची 12 पदे आणि प्रोबेशनरी अकाउंटंट ऑफिसरची 15 पदे भरण्यात येणार आहेत. प्रोबेशनरी इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे BE, BTech, B.sc अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पीजी केलेले असावे. तसेच मानव संसाधन विषयातील पदवी असावी. प्रोबेशनरी अकाउंटंटसाठी उमेदवारांनी सीए आणि सीएमए फायनल असणे आवश्यक आहे. 

अर्ज फी आणि पगार जनरल, EWS, OBC, NCL कॅटेगरीतील उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल, तर SC, ST, PH आणि EWS कॅटेगरीतील उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतो. निवडलेल्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 रुपये मासिक वेतन मिळेल. निवडलेल्या उमेदवारांना बंगळुरू, महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तराखंड सारख्या ठिकाणी नियुक्त केले जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी bel-india.in या अधिकृत वेबसाइटवर जावे. 

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनGovernmentसरकारEmployeeकर्मचारी