शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुली शिक्षणात आघाडीवर, मात्र नेतृत्वाची संधी  मिळेना; मुलांना किमान साधे वाचताही येईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:45 IST

दर १०० मुलींमागे फक्त ८७ मुले किमान वाचन पातळी गाठू शकत आहेत.

जिनिव्हा: मुली शिक्षण घेण्यात आघाडीवर असल्या तरीही नेतृत्वात मात्र पिछाडीवर आहेत. त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये नेतृत्व करण्यास मिळत नसल्याचे युनेस्कोच्या अहवालात समोर आले आहे. भारतात २०२१ मध्ये प्राथमिक शिक्षणात अर्धे प्राथमिक शिक्षक महिला होत्या. असे असले तरीही उच्च माध्यमिक शाळांमध्ये फक्त ३६% महिला मुख्याध्यापक होत्या.अहवालात जगभरातील  लिंग असमानतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वाचन कौशल्यात मुले मुलींपेक्षा सतत मागे पडत आहेत. दर १०० मुलींमागे फक्त ८७ मुले किमान वाचन पातळी गाठू शकत आहेत.

जगात फक्त १९ टक्के शिक्षणमंत्री महिला

भारतातील प्राथमिक शिक्षकांपैकी ६० टक्के महिला आहेत, परंतु केंद्रीय विद्यापीठांत केवळ १३ टक्के कुलगुरू महिला आहेत. जगात शिक्षण मंत्र्यांपैकी फक्त १९ टक्के महिला आहेत.

५ टक्केच महिला कुलगुरू

शैक्षणिक संस्थांमध्ये नेतृत्वातील लिंगभेद अजूनही खूप जास्त आहे. भारतात २०२१ मध्ये १८९ राष्ट्रीय संस्थांपैकी फक्त ५ टक्के महिलाच संचालक वा कुलगुरू होत्या. २ टक्के महिला कुलसचिव होत्या. १,२२० विद्यापीठांच्या  व्यापक सर्वेक्षणात असे आढळून आले की फक्त ९ टक्के महिला कुलगुरू होत्या आणि ११ टक्के महिला रजिस्ट्रार किंवा उच्च प्रशासकीय पदांवर होत्या. भारतीय शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणूनही महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे. पदोन्नतीमध्ये लिंगभेदाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

अहवाल काय सांगतो?

जागतिक स्तरावर शिक्षकांपैकी बहुसंख्य महिला असूनही शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक पदे आणि उच्च शैक्षणिक धोरण ठरविण्यात पुरुषांचे वर्चस्व कायम आहे. नेतृत्व महिलांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. महिला मुख्याध्यापक असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती अधिक झाली. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्स शिक्षणात महिलांना अतिशय कमी संधी आहेत. महिला शिक्षकांना पुरुषांच्या तुलनेत सरासरी ८ टक्के कमी वेतन मिळत आहे.

टॅग्स :Educationशिक्षण