शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शाखांमध्ये लवचीकता, यूजीसीकडून मसुदा जाहीर, सूचनांसाठी १३ फेब्रुवारीची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 09:28 IST

National Education Policy: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नेमकी कशी करावी याबाबतचा मसुदा यूजीसीकडून रविवारी जाहीर करण्यात आला असून, या मसुद्यावर सूचना करण्यासाठी १३ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे.

 मुंबई :  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नेमकी कशी करावी याबाबतचा मसुदा यूजीसीकडून रविवारी जाहीर करण्यात आला असून, या मसुद्यावर सूचना करण्यासाठी १३ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षणातील लवचिकतेला विशेष महत्त्व देण्यात आले असून, एका शाखेचा अभ्यासक्रम शिकत असताना दुसऱ्या शिक्षणातील क्रेडिट्स मिळविण्याची मुभा विद्यार्थ्यांना या धोरणामुळे सहज उपलब्ध होणार आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणातील नवीन संधी विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे या धोरणाद्वारे उच्च शिक्षणामध्ये सहा स्तर निश्चित करण्यात आले आहेत. याचे क्रमांक पाच ते दहा असे ठरविण्यात आले आहेत. पाचवा म्हणजे उच्च शिक्षणातील पहिला स्तर हा पदवीच्या प्रथम वर्षाचा असून तो पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. तर दहावा स्तर हा सर्वोच्च असून पीएचडीचे शिक्षण या स्तरावर दिले जाणार आहे. एकविसाव्या शतकातील आवश्यक राष्ट्रीय शैक्षणिक कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत व्हावी, या उद्देशाने अभ्यासक्रमात अमूलाग्र बदल या मसुद्यात सुचविण्यात आले आहेत. यात विद्यार्थी कोणत्याही स्तरावर शिक्षण सोडू शकतो आणि कोणत्याही स्तरावर पुन्हा त्याची सुरुवात करू शकतो. शिक्षण धोरणानुसार प्रथम वर्ष पदवीनंतर प्रमाणपत्र, द्वितीय वर्षानंतर डिप्लोमा आणि तृतीय वर्षानंतर पदवी दिली जाणार आहे.राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा- धोरणामध्ये ‘राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा’ ही देण्यात आला आहे. यामध्ये पदवी शिक्षणामध्ये ज्ञानार्जनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. -कोणत्या स्तरावर कोणत्या पातळीचे शिक्षण देण्यात यावे याबाबतचे स्पष्टीकरण या मसुद्यातून समोर आले आहे.  - यामुळे आता देशातील तंत्र, व्यावसायिक, कौशल्य, पारंपरिक उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक्रमाचा पाया एकसमान असणार आहे. सर्व देशांतील पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये एकसमान कौशल्ये असावीत, यासाठी प्रत्येक पदवीसाठी आवश्यक किमान कौशल्ये निश्चित केली आहेत.  त्यामुळे या धोरणाला विशेष महत्त्व असणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी