शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज; पहिल्या फेरीसाठी ३.७५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 08:15 IST

अंतर्गत मूल्यमापनामुळे यंदा दहावीच्या निकालात वाढ झाली असून, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावीचा निकाल लागूनही अकरावी प्रवेशासाठी ताटकळत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी अखेर शुक्रवारी जाहीर होणार आहे. शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या फेरीसाठी या पाच विभागांतून एकूण ३ लाख ७५ हजार ३५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामधील ३ लाख ६ हजार १११ विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीसाठी अर्ज स्वीकृती झाली आहे. वरील पाच विभागात एकूण ५ लाख २८ हजार ६०० जागा उपलब्ध आहेत.

अंतर्गत मूल्यमापनामुळे यंदा दहावीच्या निकालात वाढ झाली असून, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली. तसेच, प्रचलित पद्धतीने सहा आठवड्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश राबविण्यात येत असून, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जाणार आहे.

पहिल्या पसंतीक्रमास प्रवेश बंधनकारकपहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिला पसंतीक्रम मिळाला असल्यास विद्यार्थ्याला प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रवेश घेऊन एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश रद्द करायचा असल्यास त्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या परवानगीने रद्द करता येईल. मात्र त्याला पुढील फेऱ्यांसाठी प्रवेश बंद होणार असून त्याला ही विशेष फेरीसाठी थांबावे लागणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षण