शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 17:11 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षाही रद्द करण्याची करण्यात आली होती मागणी. तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारखा घोषित करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षाही रद्द करण्याची करण्यात आली होती मागणी.तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारखा घोषित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीपरीक्षा २३ मे २०२१ रोजी पार पडणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात विविध प्रवेश परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात येत असताना ही परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण विद्यर्थी पालकांमध्ये होतं. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. "कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३ मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल," असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.  राज्य परीक्षा परिषदेतर्फे दर वर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य परिस्थितीत जानेवारी फेब्रुवारी दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा २३ मे रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील ३७ जिल्ह्यांतील ७६१ परीक्षा केंद्रावर ही आठवीसाठी ही परीक्षा होणार होती. तसेच परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र ही परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करण्यात आली होती. इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार होती. परीक्षा रद्दची मागणीइयत्ता दहावीची परीक्षा राज्य शिक्षण मंडळानं, तसंच केंद्रीय शिक्षण मंडळाने रद्द केल्या आहेत. याचबरोबर जेईई, नीटच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सीए, सीएससारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील जवळपास १ लाख विदयार्थ्यांनी केंद्रांवर जाऊन परीक्षा देणे, तेथे पर्यवेक्षक, केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, शिपाई यांची नेमणूक करणे यांची नेमणूक करणे योग्य नाही. राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनीही परीक्षा रद्दची मागणी केली होती. यामुळे विद्यार्थी आणि या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सगळ्यांच्याच सुरक्षित आरोग्याला हानी पोहचू शकते अशी भीती व्यक्त होत होती.

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसScholarshipशिष्यवृत्तीVarsha Gaikwadवर्षा गायकवाड