शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा मुलांचा ‘टीसी’ नाकारू शकते का?

By प्रगती पाटील | Updated: June 11, 2024 09:34 IST

Education News: एका शाळेकडून दुसऱ्या शाळेत सामील होण्यासाठी मुलाचे हस्तांतरण प्रमाणपत्र मिळविण्याचा अधिकार पालकांना आहे. कोणत्याही कारणास्तव, केवळ विद्यार्थ्याची फी भरलेली नाही म्हणून शाळेच्या अधिकाऱ्यांना हा दाखला देणे नाकारता येत नाही. शाळेच्या विविध प्रकारच्या शुल्कापोटी कोणतीही रक्कम देय असल्यास, वसुलीसाठी पालकांविरुद्ध योग्य कार्यवाही करण्याची मुभा कायद्याने शाळांना दिली आहे; पण शुल्क भरले नाही म्हणून शाळा सोडल्याचा दाखला नाकारणे हे बेकायदेशीर आहे.

- प्रगती जाधव-पाटील (उपसंपादक, लोकमत, सातारा)

काही कारणाने फी भरली नाही तर शाळा टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) नाकारू शकते का?     - रसिका यादव, डोंबिवलीआपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे या उद्देशाने चांगल्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचा पालकांचा आग्रह असतो. प्रसंगी पोटाला चिमटा काढून मुलांचे शैक्षणिक शुल्क पालक भरतात; पण आर्थिक कारणांनी पालक जेव्हा मुलांना शाळेतून काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र शालेय व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यास टाळाटाळ करते.  संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरल्याशिवाय हा दाखला न देण्याची भूमिका व्यवस्थापन घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याचा विचार करून कायद्यात स्वतंत्रपणे  तरतूद करण्यात आली आहे. 

एका शाळेकडून दुसऱ्या शाळेत सामील होण्यासाठी मुलाचे हस्तांतरण प्रमाणपत्र मिळविण्याचा अधिकार पालकांना आहे. कोणत्याही कारणास्तव, केवळ विद्यार्थ्याची फी भरलेली नाही म्हणून शाळेच्या अधिकाऱ्यांना हा दाखला देणे नाकारता येत नाही. शाळेच्या विविध प्रकारच्या शुल्कापोटी कोणतीही रक्कम देय असल्यास, वसुलीसाठी पालकांविरुद्ध योग्य कार्यवाही करण्याची मुभा कायद्याने शाळांना दिली आहे; पण शुल्क भरले नाही म्हणून शाळा सोडल्याचा दाखला नाकारणे हे बेकायदेशीर आहे. शाळा विनाअनुदानित असल्यास  तिच्या उदरनिर्वाहासाठी कायदेशीररीत्या देय असलेली फी मिळवण्याचा अधिकार शाळेलाही आहे; पण म्हणून शाळा एखाद्या मुलाला त्याच्या आवडीच्या दुसऱ्या शाळेत दाखल होण्यासाठी आवश्यक  दाखला नाकारू शकत नाही.

दाखला अडविण्याचे प्रकार पुढे आल्यास संबंधित शाळेच्या विरोधात शिक्षण विभागाकडे लेखी तक्रारीद्वारे दाद मागता येते. आपल्या तक्रारीत पालकांनी स्पष्टपणे शाळेचे नाव आणि आपली समस्या मांडणे अपेक्षित आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत शिक्षण विभागाकडून संबंधित शाळेला सूचनापत्र पाठविले जाते.  अपेक्षित उत्तर नाही मिळाले तर संबंधित शाळेच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस काढण्यात येते. या माध्यमातून विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला मागविला जातो.(सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com)

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी