शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता १२ वीच्या परीक्षेचं काय होणार? केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची उद्या राज्यांच्या मंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 16:08 IST

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक उद्या रविवार दिनांक २३ मे रोजी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्री तसेच सचिवांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक उद्या रविवार दिनांक २३ मे रोजी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्री तसेच सचिवांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील इयत्ता १२ वीच्या परीक्षांबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता १२ वीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही? असा पेच शिक्षण विभागापुढे आहे. त्यामुळे याबाबत उद्याच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. इयत्ता १२ वीच्या परीक्षांसोबतच इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रवेश परीक्षांबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी ट्विट करुन उद्याच्या बैठकीची माहिती दिली आहे. देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्री आणि सचिवांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. रमेश पोखरियाल यांच्यासोबतच बैठकीला महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी तसेच केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर देखील उपस्थित असणार आहेत. 

इयत्ता १२ वीच्या परीक्षांचे काय होणार?कोरोना प्रादुर्भावामुळे देशात इयत्ता १२ वीच्या परीक्षा अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत. तसेच अनेक स्पर्धा परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी याआधीच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून शालेय शिक्षण, शिक्षण मंत्रालय तसेच सीबीएसई विद्यार्थी व शिक्षकांकडून सुरक्षेचा विचार करुन परीक्षा कशा घेता येतील यासंदर्भात विचार सुरू असल्याचं म्हटलं होतं.  

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र