शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तके ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्यावरून राज्यातील शिक्षण तज्ज्ञांकडून कडाडून टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:09 IST

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी बालभारतीला विज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी आणि व्यावसायिक शिक्षण यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तके  ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्याचे पत्र पाठवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी बालभारतीला विज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी आणि व्यावसायिक शिक्षण यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तके  ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्याचे पत्र पाठवले आहे. मात्र, राज्यात विविध  भाषा आणि विषयांतील शेकडो तज्ज्ञ संशोधक असताना एनसीईआरटीच्या पुस्तकांचे भाषांतर करण्याची गरज नाही, असे म्हणत या भूमिकेवर राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, मराठीप्रेमी आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी टीका केली आहे. शालेय विद्यार्थ्यांची नीट, जेईईसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी सुलभ व्हावी, यासाठी हे धोरण असल्याचे पत्रात म्हटले आहे. 

बौद्धिक दिवाळखोरी !राज्यातील स्थानिक गरजा, भाषा, सांस्कृतिक विविधता आणि शैक्षणिक पारंपरिक अभ्यास लक्षात न घेता दिल्लीतून थेट पुस्तके स्वीकारणे, त्या पुस्तकांची केवळ भाषांतरे करणे म्हणजे ही बौद्धिक दिवाळखोरी असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘दुय्यम ठरवण्याचा प्रकार’मराठीशिवाय अन्य माध्यमांसाठी एनसीईआरटी किंवा सीबीएससीईच्या पाठ्यपुस्तकांचे भाषांतर करून ती स्वीकारण्यात यावी. हे काम बालभारती मंडळाने करावे. राज्यातील शिक्षण वर्तुळातील जाणकारांनी या मुद्द्यालादेखील आक्षेप घेत वैचारिक दारिद्र्याचे हे लक्षण असल्याची बोचरी टीका केली. हे धोरण राज्यातील अभ्यासक, संशोधक, तज्ज्ञांना दुय्यम ठरविण्यासारखे आहे, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

बालभारती फक्त एनसीईआरटीच्या पुस्तकांचे ‘जसेच्या तसे’ अनुवाद करणारी सहायक कारकुनी संस्था करायची आहे का? आजवर गणित, विज्ञानाची पुस्तके महाराष्ट्रातील तज्ज्ञ, अभ्यासकच करत आले आहेत. आजच ते अपात्र झाले का? असा प्रश्न साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला.

मागील सुकाणू समितीच्या बैठकीत एनसीईआरटीच्या विज्ञान व गणिताच्या अभ्यासक्रमातून आवश्यक तो सर्व भाग घ्यावा. त्यानुसार राज्यातील पाठ्यपुस्तके तयारी करावीत, असे ठरले होते. आताच्या जीआरमध्येही तसेच म्हटलेले असून, केवळ ‘जशी आहेत तशी’ असा शब्द प्रयोग आल्याने गोंधळ झाला आहे, अशी प्रतिक्रिया राज्य शालेय शिक्षण सुकाणू समितीचे मिलिंद नाईक यांनी दिली.

राज्यात पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके तयार करणारे संशोधक, तज्ज्ञ मंडळींसह सक्षम यंत्रणाही राज्यात आहे. दिल्लीच्या एनसीईआरटीच्या ओंजळीने पाणी पिण्याची गरज नाही. अन्यथा हे तर दिवाळखोरीचे लक्षण म्हणावे लागेल, असे महाराष्ट्र शिक्षक सेनेचे शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर म्हणाले.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनEducationशिक्षण