शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांवर इंग्रजी माध्यमाची सक्ती नको; राजस्थान उच्च न्यायालयाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 05:34 IST

शाळेत सुरुवातीपासूनच शिक्षणाचे माध्यम हिंदी होते. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात राजस्थान सरकारने दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे १२०० महात्मा गांधी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची घोषणा केली.

- खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्क जोधपूर : राज्य सरकार कायदा करूनही मुलांवर शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम लादू शकत नाही. मातृभाषेतून शिक्षणाची हमी भारतीय राज्यघटनेत कलम १९ (१) (अ) द्वारे दिलेली आहे, असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे.

श्री हरी सिंग सीनियर सेकंडरी शाळा, पिलवा (जोधपूर) गावात १९८० पासून कार्यरत आहे. पिलवा आणि जवळपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे ६०० मुला-मुलींची शैक्षणिक गरज ही शाळा भागवते.शाळेत सुरुवातीपासूनच शिक्षणाचे माध्यम हिंदी होते. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात राजस्थान सरकारने दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे १२०० महात्मा गांधी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची घोषणा केली. ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व गावांमध्ये इंग्रजीतून शिक्षण देण्याचे नियोजन होते.

या पार्श्वभूमीवर शाळा विकास व्यवस्थापन समितीने (एसडीएमसी) इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या गरजेबद्दल चर्चा केली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे महत्त्व आणि आवश्यकता लक्षात घेऊन एसडीएमसीने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यास पाठिंबा दिला मात्र सध्याची हिंदी माध्यमाची शाळा बंद न करण्याचा ठराव केला व तसे शासनास कळवले. तथापि, संचालक, माध्यमिक शिक्षण यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये ३४५ शाळांचे महात्मा गांधी सरकारी इंग्रजी माध्यम शाळेत रूपांतर करणारे आदेश काढले. यामध्ये या शाळेचाही समावेश होता.शाळेच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या शिक्षण विभागाकडे आक्षेप नोंदवला पण त्यांची दखल घेतली गेली नाही. 

राज्य सरकारच्या या निर्णयाला एसडीएमसीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने ही याचिका मान्य करताना आपल्या इच्छेनुरूप भाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार घटनेच्या कलम १९ (१) (अ) (अभिव्यक्ती स्वातंत्र्य)शी संबंधित आहे. मुलाला, किंवा त्याच्या वतीने, त्याच्या पालकांना, मुलाला कोणत्या भाषेत शिक्षण घ्यायचे हे निवडण्याचा अधिकार आहे.यासंदर्भात, न्यायालयाने कर्नाटक वि. इंग्रजी माध्यम प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व्यवस्थापन संघटनामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ दिला. त्यात मातृभाषेतून किंवा विशिष्ट माध्यमातून शिक्षण घेण्याच्या अधिकाराला भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) द्वारे हमी दिलेली आहे, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायदा २००९ चा संदर्भ देत हायकोर्टाने असे निरीक्षण नोंदविले की, मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार हा या कायद्याच्या कलम २९ (२)(एफ) अन्वये मिळणारा संवैधानिक अधिकार आहे. या तरतुदीनुसार, शिक्षणाचे माध्यम, शक्यतो मातृभाषेत असणे आवश्यक आहे.

राज्य सरकार कायदा करूनही मुलांवर इंग्रजी हे शिक्षणाचे माध्यम लादू शकत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) अन्वये संरक्षित केला गेलेला मुलाला हवे त्या माध्यमात शिकविण्याचा मूलभूत अधिकार राज्य सरकार कमी करू शकत नाही.-न्यायमूर्ती दिनेश मेहता, राजस्थान उच्च न्यायालय, जोधपूर 

टॅग्स :Schoolशाळा