शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
5
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
6
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
7
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
8
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
9
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
10
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
11
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
12
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
13
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
14
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
15
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
16
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
17
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
18
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
19
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
20
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

शाब्बास पोरा! वडील रोजंदारी मजूर, मुलगा भारतीय सैन्यात झाला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 14:32 IST

रोज 100 रुपये कमावणाऱ्या मजुराचा मुलगा सैन्यात अधिकारी झाला.

Success Story : आयुष्यात मोठे काम करण्याचा निश्चय केला, तर जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. एका तरुणाने ही गोष्ट खरी करुन दाखवली आहे. अतिशय गरीब घरात जन्मलेल्या आणि गरिबीत आयुष्य काढणाऱ्या तरुणाने असे काम करुन दाखवले, ज्यामुळे त्याच्या वडिलांचीही छाती अभिमानाने फुलून निघाली आहे. ही गोष्ट भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट झालेल्या 23 वर्षीय कबिलन व्ही यांची आहे. शनिवारी झालेल्या इंडियन मिलिटरी अकादमीच्या पासिंग आऊट परेडनंतर तो अधिकृतपणे भारतीय लष्करात सामील झाला. हा क्षण त्यांच्यासाठीच नाही, त्यांच्या कुटुंबासाठीही अभिमानाचा होता.

वडील मजूर, मुलगा सैन्यात अधिकारीकबिलन तामिळनाडूच्या मदुराईजवळ असलेल्या मेलूर या छोट्या गावातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील वेत्रीसेल्वम पी 100 रुपये रोजाने मजूर म्हणून काम करायचे. पण, आता अर्धांगवायू झाल्यामुळे ते व्हीलचेअरवर असतात. आपल्या मुलाच्या यशाने ते खूप खूश आहे. काबिलनच्या आईचे तीन वर्षांपूर्वी कर्करोग आणि कोविड -19 मुळे निधन झाले आहे. 

कबिलन काय म्हणाले?आपल्या यशाबाबत सांगताना काबिलन म्हणतात, 'मी अनेकदा अपयशी ठरलो, पण संरक्षण दलात सामील होण्याचे स्वप्न होते. म्हणूनच मी कठोर परिश्रम केले आणि आज भारतीय सैन्यात दाखल झालो. हे फक्त माझे वैयक्तिक यश नाही, तर ते भारतीय सैन्यात सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे आहे. फक्त 100 रुपये रोज कमावणाऱ्या मजुराचा मुलगा हे करू शकतो, तर कोणीही करू शकतो.

प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतूनमेलूर गावात वाढलेल्या कबिलन यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतून झाले असून, अण्णा विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. सैन्यात भरती होण्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज केले होते, परंतु प्रत्येक वेळी त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी हार मानली नाही आणि आज त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे.

नोकरीबरोबरच अभ्यासआई गमावल्यानंतर कबिलन यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांचा धाकटा भाऊ सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असल्याने आणि त्याच्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने, कबिलनने अभ्यासासोबतच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) अंतर्गत बचाव दलातही पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नोकरी करत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि यश संपादन केले.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षणIndian Armyभारतीय जवान